AskSRK: Shah Rukh Khan's Hilarious Response to a Fan Asking Him About 'Jawan 2' Esakal
मनोरंजन

Jawan: जवान येण्यापुर्वीच जवान 2 ची तयारी सुरु! अपडेट विचारताच शाहरुख म्हणाला,..

Vaishali Patil

Jawan: सध्या बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख त्याच्या जवन या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या जवानची पुर्ण टिमच या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यातच काही दिवसांपुर्वी दुबईच्या बुर्जखलिफा येथे जवानचा ट्रेलर रिलिज करण्यात आला.

या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. त्याच्या परिणाम चित्रपटाच्या अॅडवान्स बुकिंगवर दिसत आहे. शाहरुखच्या जवान चित्रपटाने त्याच्याच पठाण सिनेमाचं रेकॉर्ड मोडला आहे.

दरम्यान शाहरुख या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळे फंडे वापरत आहे. यासाठीचट त्याने चाहत्यांसाठी ASKSRK सत्राचे आयोजन देखील केले होते. यापुर्वी देखील शाहरुखने चाहत्यांच्या प्रश्नाची उत्तर दिली आहे. तसचं काहीस यावेळीही झालं. शाहरुखच्या चाहत्यांनी त्याला या सत्रात बरेच वेगवेगळे प्रश्न विचारले आणि शाहरुखने देखील सर्व प्रश्नांना उत्तर दिली.

यावेळी घेतलेल्या ASKSRK सत्रात शाहरुख खानने अॅडव्हान्स बुकींग आणि चित्रपटाच्या स्पॉयलर्सबाबत चाहत्यांच्या प्रश्नांना मजेशीर उत्तर दिली. शाहरुख खानने #AskSRK सत्रात त्याच्या ट्रोलर्सना देखील शांत केलं.

याच सेशनमध्ये एका चाहत्याने शाहरुखला विचारलं की, 'जवान 2' कधी येणार? यावर शाहरुखने मजेशीर उत्तर दिले. यात शाहरुख म्हणाला, 'आधी हे बघा... बच्चे की जान लोगे क्या?'

त्यामुळे आता पुन्हा शाहरुखच्या जवान आणि 'जवान 2' ची प्रतीक्षा लागली आहे. या उत्तरानंतर किंग खानचे चाहते खूप खूश झाले. त्यांनी शाहरुखला त्याच्या आगामी सिनेमांसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

सुमारे 15 मिनिटांच्या या सत्रात शाहरुखने खुप साऱ्या प्रश्नांची उत्तर दिली. त्याला एका चाहत्याने विचारलं की, “तुम्ही माझ्या मैत्रिणीसाठी जवानचं तिकीट देऊ शकता का? मी एक वाईट बॉयफ्रेंड आहे."

शाहरुखने या चाहत्याला उत्तर देताना लिहिले की, “भाऊ, मी तुला फुकट प्रेम देतो… तिकिटासाठी फक्त पैसे लागतील. रोमांसच्या वेळी इतके स्वस्त होऊ नको...जा आणि तिकीट खरेदी कर आणि तिला तुझ्यासोबत घेऊन जा."

चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर 2023 मध्ये रिलीज झालेल्या 'पठाण' नंतर 'जवान' हा शाहरुखचा दुसरा चित्रपट आहे. 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शाहरुखच्या जवानमध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, नयनतारा, विजय सेतुपती आणि सुनील ग्रोव्हर देखील दिसणार आहेत. त्यामुळे आता शाहरुखचा जवान त्याच्या पठाणचा आणि सनी देओलच्या गदरचा रेकॉर्ड मोडू शकतो का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

Manmad Indore Railway Project : जोपर्यंत मोबदला जाहीर होत नाही, तोपर्यंत मोजणी नाही! मनमाड-इंदूर रेल्वे बाधित शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT