Shah Rukh Khan's home Mannat new name plate price Google
मनोरंजन

शाहरुखच्या 'मन्नत' ची नेमप्लेट लाखो रुपयांची, किंमत ऐकून चक्रावले चाहते

शाहरुखनं काही दिवसांपूर्वी आपल्या मन्नत बंगल्याची नेमप्लेट बदलल्यामुळे ट्वीटरवर मोठी चर्चा रंगली होती.

प्रणाली मोरे

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान(Shahrukh Khan) तब्बल तीन वर्षांनतर सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला आहे. पण जसं त्यानं काम सुरु केलं तशी त्याची जोरदार चर्चाही अनेक कारणांमुळे रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या वेंडिंग पार्टीत शाहरुख काळे पडदे लावलेल्या भल्यामोठ्या गाडीतून पोहोचला होता. त्यानंतर बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत तो दिसला होता. तेव्हा त्यानं अगदी मनसोक्त मीडियाच्या कॅमेऱ्याला वेगवेगळ्या पोझ दिल्या. त्यानंतर शाहरुख पुन्हा चर्चेत आला ते त्याच्या मन्नत बंगल्यामुळे. त्याचा बंगला ट्वीटरवर ट्रेंड झाला अन् पुन्हा किंग खानची चर्चा रंगलेली पहायला मिळाली.

त्याचं झालं असं की, शाहरुखनं आपल्या घराची नेमप्लेट(Name Plate) बदलली अन् त्यानंतर प्रत्येक ठिकाणी याची चर्चा होऊ लागली. आता कारणही खास आहे चर्चेचं. केवळ नेमप्लेट नाही तर त्यामागचा खर्च हे देखील चर्चेचं मुख्य कारण ठरत आहे. शाहरुखनं नेमप्लेट बदलल्यानंतर तर चाहत्यांनी कहरच केलेला दिसून आला. शाहरुखच्या नेमप्लेटसोबत चाहत्यांनी वेगवेगळ्या अॅंगलने फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केलेले आपण पाहिलेच असतील.

आता हे तर खरं आहे की इंटेरिअर डिझायनर असलेली शाहरुखची बायको गौरी खान हिच्या मार्गदर्शनाखाली या नेमप्लेटचं डिझाइन साकारण्यात आलं आहे. आता चक्क या नेमप्लेटची किंमत चर्चेत आली आहे. बोललं जात आहे की,या नेमप्लेटसाठी तब्बल २० ते २५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. गौरीला नेमप्लेटचा क्लासी लूक हवा होता,जो त्यांच्या कुंटुबाच्या स्टॅंडर्डलादेखील शोभून दिसेल. या नेमप्लेटचा खर्च ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी तोंडात बोटं घातली आहे. 'बडे लोक,बडी बातें' हे आहेच पण फक्त नेमप्लेटवर इतका खर्च म्हटल्यावर इंटरनेट चक्रावून गेलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT