Jawan Collection: UAE SAKAL
मनोरंजन

Jawan Collection: शाहरुखच्या 'जवान'चा यूएईमध्ये डंका! 'हा' विक्रम करणारा ठरला एकमेव भारतीय चित्रपट

Vaishali Patil

Jawan Collection UAE: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी सिनेमा डंकीसाठी चर्चेत आहे. त्याचा हा सिनेमा डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची आत्तापासूनच चाहत्यांमध्ये क्रेझ आहे.

मात्र शाहरुखचा काही दिवसांपुर्वी रिलिज झालेला जवान हा सिनेमा अजूनही चर्चेत आहे. शाहरुखच्या जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुराळा उडवला. पठाणनंतर सलग दुसरा हिट सिनेमा शाहरुखनं दिला.

त्यामुळे जवानने अनेक विक्रम केले. या चित्रपटाने भारतात 600 कोटी तर जगभरात1000 कोटींचा टप्पा पार केला. जवान चित्रपट रिलीज होऊन एक महिन्याहून अधिक काळ असला तरी जवानचा दबदबा पहायला मिळत आहे.

आता जवान चित्रपटाने दमदार कमाई करताना बॉक्स ऑफिसवरचे अनेक विक्रम मोडले यासोबतच चित्रपटाने यूएईमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.

'जवान' हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आणि चौथा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. मात्र तरीही या चित्रपटाची जादू ओसरलेली नाही. या चित्रपटाने UAE बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार 'जवान' यूएईमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यासोबतच जवान हा बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतचा 9वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. यूएईमध्ये जवानने USD 9.17 दशलक्ष म्हणजेच 75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. जवानने या कमाईसह या यादित 9 वे स्थान मिळवले आहे.

अवतार 2, एवेंजर एंडगेम, स्पायडरमॅन : नो वे होम , फ्यूरियस 7, द फेट ऑफ द फ्यूरियस , अलादीन , टॉप गन : म्हेवरिक , द लायन किंग या चित्रपटाचा समावेश आहे ज्यात जवानने आपल्या नावाचा सामावेश केला आहे.

तर दुसरीकडे उद्या किंग खानच्या वाढदिवसानिमित्त 'जवान' नेटफ्लिक्सवर रिलीज होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र OTT प्लॅटफॉर्मवर 'जवान' च्या अधिकृत रिलीजची तारीख स्ट्रीमरने सांगितलेली नाही.

'जवान'चे दिग्दर्शन अॅटली यांनी केले आहे. शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, एजाज खान, सुनील ग्रोवरसह अनेक स्टार्सनी या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि संजय दत्त यांचाही खास कॅमिओ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT