मनोरंजन

गौरी खानच्या हातात 'ब्लॅक वॉटर'; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

जाणून घ्या, नेमकं काय आहे 'ब्लॅक वॉटर'?

स्वाती वेमूल

बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानची पत्नी गौरी खानचा Gauri Khan एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये गौरीच्या हातात 'ब्लॅक वॉटर'ची black water बाटली पहायला मिळत आहे. यामुळे तिला नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं आहे. जुहूमधील ऑफिसमधून बाहेर पडताना गौरीचा कॅज्युलअ लूक पहायला मिळाला. मात्र यावेळी तिच्या हातात 'ब्लॅक वॉटर' होतं. बॉलिवूड कलाकारांपासून अनेक सेलिब्रिटी खेळाडूंच्या हातात अनेकदा ब्लॅक अल्कलाइन वॉटर बॉटल पहायला मिळतं. या पाण्याचे आरोग्यासाठी काही खास फायदे असल्याचं म्हटलं जातं.

डेनिम, कॅमोफ्लेज जॅकेट आणि ब्लॅक टॉप असा गौरीचा लूक होता. गौरीच्या हातातील पाण्याची बाटली पाहून अनेकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. या सेलिब्रिटींच्या हातात कधीच साधी पाण्याची बाटली पहायला मिळत नाही, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.

ब्लॅक वॉटरला प्राधान्य का?

ब्लॅक वॉटरमध्ये अल्ट्रा हायड्रेटिंग आणि अँटी एजिंग गुणधर्म असल्याने अनेक सेलिब्रिटी त्याला प्राधान्य देताना दिसतात. तज्ज्ञांच्या मते, ब्लॅक वॉटर शरीरातील अॅसिड नियंत्रित किंवा कमी करण्यास मदत करते. त्याचसोबत रोगप्रतिकारशक्ती आणि चयापचय वाढवण्यास मदत करते. याआधी मलायका अरोरा, श्रुती हासन, उर्वशी रौतेला यांसारख्या सेलिब्रिटींच्या हातातही ब्लॅक वॉटर पाहिलं गेलं. क्रिकेटर विराट कोहलीसुद्धा ब्लॅक वॉटर पित असल्याची चर्चा होती.

सामान्य RO पाण्यात 7 pH आणि शून्य खनिजं असतात, तर ब्लॅक वॉटरमध्ये ८+pH (अल्कलाइन) आणि ७० पेक्षा जास्त नैसर्गिक खनिजे असल्याचं म्हटलं जातं. यामुळे शरीरातील अॅसिडचं प्रमाण कमी करून ते हायड्रेटेड आणि डिटॉक्स केले जाते. त्याचप्रमाणे शरीराचं कार्य सुधारत असल्याचंही म्हटलं जातं. ब्लॅक वॉटरचे शरीराला अनेक फायदे असल्याने सेलिब्रिटी त्याचा वापर अधिकाधिक करताना दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Government Directors : अखेर 'त्या' अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी; गोकुळवर पाच शासकीय संचालक नियुक्तीचा मार्ग मोकळा, मतदानाचाही मिळाला अधिकार

IND vs NZ 2nd ODI Live : वेलिंग्टन वन डे सामन्याला विलंब का होतोय? मॅच सुरू व्हायची वेळ झाली, पण अजून टॉसही झालेला नाही; जाणून घ्या अपडेट्स

Gokul Chairman Election Controversy : 'जय-पराजय होतात, पण माझ्या मुलाबद्दल जे केलं त्याबद्दल फार खंत वाटते, ते जिव्हारी लागलंय'; हसन मुश्रीफांनी व्यक्त केलं दु:ख

Daily Horoscope : राशिभविष्य - शनिवारी ७ नोव्हेंबर २०२६

Mohammed Shami retirement from Tests: "आज, जड अंतःकरणाने..."; मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; म्हणाला, चांगल्या-वाईट काळात माझ्यावर...

SCROLL FOR NEXT