Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Esakal
मनोरंजन

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya: काली अखियां नव्हे आता शाहिद अन् क्रिती घेऊन आलेय 'लाल पीली अखियां'!

शाहिद कपूर अन् क्रितीच्या आगामी रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाचे नाव 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' आहे.

Vaishali Patil

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री क्रिती सेनन हे सध्या त्याच्या आगमी सिनेमामुळे चर्चेत आहे. ही जोडी पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. दोघेही या रोमँटिक चित्रपटात रोमान्स करताना दिसणार आहेत.

शाहिद कपूर अन् क्रितीच्या आगामी रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाचे नाव 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' आहे. गेल्या वर्षी, 9 एप्रिलला शाहिद कपूरने सोशल मीडियावर त्याच्या आणि क्रिती सेननच्या रोमँटिक चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर शेअर केला होता. आता काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचे नाव आणि रिलिज डेटही समोर आली.

आता या चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आता 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'चे पहिले गाणे 'लाल पीली अखियां' रिलीज झाले आहे, ज्यामध्ये शाहिद आणि क्रिती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. क्रिती आणि शाहिदच्या केमिस्ट्रीचे नेटकऱ्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. नीरज राजावत यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत तर 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या गाण्याला तनिष्क बागचीने आवाज दिला आहे. सध्या हे गाणे सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.

क्रिती आणि शाहिदचा हा सिनेमा व्हॅलेंटाईन वीकमध्ये रिलिज होणार आहे. हा सिनेमा 9 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 18 जानेवारीला रिलिज करण्यात येणार आहे.

या चित्रपटात क्रिती-शाहिद व्यतिरिक्त बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि धमेंद्र देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केले आहे.

दिनेश विजन, ज्योती देशपांडे आणि लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात शाहिद एका वैज्ञानिकाची भूमिका साकारत आहे, जो एका रोबोटच्या प्रेमात पडतो. या चित्रपटात क्रिती सेनन रोबोटच्या भूमिकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT