Shahid Kapoor News esakal
मनोरंजन

Shahid Kapoor Interview: 'ही लोकं कुणालाही सहजासहजी स्विकारत नाहीत'! शाहिद कपूरनं सांगितलं बॉलीवूडमधलं 'ते' सत्य

बॉलीवूडमध्ये मला काही कमी त्रास झालेला नाही. ती लोकं नेहमीच....शाहिदची (Shahid Kapoor Interview) मुलाखत आता चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे

Shahid Kapoor Latest News: बॉलीवूडचा स्टार अभिनेता शाहीद कपूर एका मुलाखतीमध्ये जे काही बोलला त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा (Shahid Kapoor New Movie) धक्का बसला आहे. त्याच्या बाबत असे काही घडले असेल याची त्यांना कल्पना नव्हती. शाहिदनं स्वताला बॉलीवूडमध्ये आऊटसायडर म्हणवून घेतले आहे.

तेरी बातों में ऐसा उलझा जिया (TBAUJ) नावाच्या चित्रपटानं शाहिदला पुन्हा एकदा ट्रॅकवर आणलं आहे. गेल्या वर्षी त्याची फर्जी नावाची सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आला होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यंदाच्या वर्षी त्याचा दुसरा सीझन चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. त्याचे दिग्दर्शन राज अँड डीकेनं केलं आहे.

बॉलीवूडमधील कँप या संकल्पनेवर शाहिदनं त्याचे मुद्दे मांडले आहे. डीएनएनं त्याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. शाहिदनं नेहा धुपियाच्या पॉडकास्टमध्ये त्याचे विचार मांडले आहेत. ते सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे. शाहिद म्हणतो मी बॉलीवूडमध्ये आऊटसायडर होतो. त्यामुळे मला खूप काही सहन करावे लागले होते.

मला बॉलीवूडमधील त्या लोकांच्या कँपमध्ये जाण्याची इच्छा नव्हती. मला वाटतं माझ्यात त्यांच्यात सहभागी होण्याची पात्रती नव्हती. म्हणून मी बाहेर फेकला गेलो असेल. मी दिल्लीतून जेव्हा मुंबईत शिफ्ट झालो होतो. आणि मुंबईतील शाळेत गेलो तेव्हाही मला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता.

मी त्या सगळ्यांच्या दृष्टीनं आऊटसायडर होतो. याचे कारण माझी भाषा. मी मुळचा दिल्लीचा राहणारा.त्यामुळे माझ्या भाषेवर दिल्लीचे संस्कार होते. माझ्या बोलण्यातून ते जाणवायचे. पुढे मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये मी आलो तेव्हा त्या लोकांनी मला फार काही सहजासहजी स्विकारले नाही. त्यांना तुमच्याबद्दल खूप भीती वाटू लागते.

ही लोकं तुमच्याविषयी खूप असुरक्षित असतात. त्यांच्या मनात तुमच्याविषयी खूप भीतीही असते. तुम्ही बऱ्याच वर्षांपासून त्यांच्याशी दोन हात करत असाल तर मग ते तुम्हाला तुमच्यात अॅड करुन घेतात. अशा शब्दांत शाहिदनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT