Shahid Kapoor Cooked Pasta For Wife Mira Rajput  
मनोरंजन

हा सुपरस्टार अभिनेता पहिल्यांदाच बनला शेफ, त्याच्यावर अशी कोणती वेळ आली ? ज्यामुळे त्याला असे पाऊल उचलावे लागले...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : अनेकांच्या मनात स्थान निर्माण केलेले बॉलिवूडमधील हॉट कपलपैकी एक जोडी म्हणजे अभिनेता शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत या दोन्ही लव्ह कपल्सने. या दोघांनी २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली.  ही जोडी बऱ्याच वेळा चाहत्यांच लक्ष वेधून घेत असते. त्यामुळे अनेक वेळा सोशल मीडियावर या  जोडीची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं. त्यातच मीराच सोशल मीडियावर शाहिदपेक्षा जास्त वावर असल्याचं पाहायला मिळतं.

अलिकडेच तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर करत लग्नानंतर पहिल्यांदाच शाहिद तिच्यासाठी शेफ झाल्याचं म्हटलं आहे. सध्या लॉकडाउन असल्यामुळे देशातील इतर नागरिकांप्रमाणेच सेलिब्रिटीदेखील घरीच बसून आहेत. त्यातच शाहिदने पहिल्यांदाच मीरासाठी खास पदार्थ तयार केला. या पदार्थाचा फोटो शेअर करत मीराने पाच वर्षांत पहिल्यांदाच शाहिदने माझ्यासाठी खास पदार्थ केल्याचं सांगितलं.


शाहिदने मीरासाठी खास पास्ता तयार केला होता. या पाच वर्षांत पहिल्यांदाच माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी जेवण तयार केलं आहे. आजपर्यंत खाल्लेल्या पास्तांपैकी हा सगळ्यात बेस्ट आहे. अशी कॅप्शन मीराने पोस्ट शेअर करत दिली आहे.

तर शाहिद कपूर लवकरच ‘जर्सी’ या चित्रपटात झळकणार आहे. ‘जर्सी’ हा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. यापूर्वी तो ‘कबीर सिंग’ या चित्रपटात झळकला होता. हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक होता. या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळविली असून या चित्रपटानंतर शाहिदच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. नेहमीच चर्चेत राहिलेला शाहिद कपूर आजही खूप प्रसिद्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांनो सावधान! PM Kisanचा 24वा हप्ता येण्याआधी ‘ही’ एक गोष्ट तपासा, नाहीतर लाभापासून मुकाल

Pune News: यंदा कार्तिकी वारीत गटारात तीर्थस्नान! मृत माशांचा खच अन् दुर्गंधीयुक्त सांडपाणी; कार्तिकी वारीपूर्वी इंद्रायणीची अवस्था चिंताजनक

Sangli Crime : ईश्वरपूर हादरले! लॉजवर नेऊन शीतपेयातून दारू पाजून महाविद्यालयीन तरुणीवर दोघांकडून जबरदस्तीने बलात्कार; मारहाण करत जिवे मारण्याचीही धमकी

Latest Marathi News Live Update : पुण्यात शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कुणाकडे? २४ नोव्हेंबरला होणार फैसला!

Highway Accident: महामार्गांवरील भीषण अपघातांना बसणार वेसण; अकराशे पोलिसांची २४ तास गस्त, नाशिकसह २५ जिल्ह्यांतील यंत्रणा सक्रिय

SCROLL FOR NEXT