Shahid Kapoor says he was ‘destroyed’ when pictures of his kiss with Kareena Kapoor leaked in media SAKAL
मनोरंजन

Shahid Kapoor: केवळ ५०० रुपयांसाठी लीक झालेला शाहीद - करीनाचा किसींग फोटो, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

शाहीद - करीना कपूरचा किसींग फोटो फक्त ५०० रुपयांसाठी लीक झाला होता.

Devendra Jadhav

Shahid Kapoor Kareena Kapoor Kissing Photo Viral News: बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता शाहीद कपुर. शाहीद कपुरने आजवर अनेक सिनेमांमध्ये दमदार भुमिका साकारल्या.

कधी ऐतिहासीक, कधी अॅक्शन तर कधी रोमॅंटीक अशा विविध भुमिकांमधुन शाहीद वारंवार प्रेक्षकांच्या भेटीला येत राहीला.

अशातच शाहीदने त्याच्या भुतकाळाबद्दल धक्कादायक खुलासा केलाय. शाहीद - करीना कपूरचा किसींग फोटो फक्त ५०० रुपयांसाठी लीक झाला होता.

'मिड डे'शी संवाद साधताना शाहिद कपूर म्हणाला की, हा फोटो बाहेर आल्यावर शाहीद 'उद्ध्वस्त' होण्याच्या मार्गावर होता. तो म्हणाला, 'मी त्यावेळी उद्ध्वस्त झालो होतो.

मी फक्त 24 वर्षांचा होतो आणि मला वाटले की माझ्या प्रायव्हसीवर कोणीतरी आक्रमण केले गेले आहे. याशिवाय मी माझी प्रायव्हसी संरक्षणासाठी काहीही करू शकत नाही.

मी विचार करत होतो, काय झालंय आणि काय होतंय. याचा तुमच्यावर खूप चुकीचा परिणाम होतो. तो म्हणाला की विशेषत: त्या वयात, जेव्हा एखाद्याला त्यांच्या भावना समजू लागतात आणि डेटिंग सुरू होते, तेव्हा या गोष्टी घडल्या.

या क्षणी सोशल मीडिया आणि पापाराझी संस्कृती लक्षात घेऊन आता गोष्टी कशा बदलल्या आहेत असे विचारले असता,

शाहिद म्हणाला, 'जेव्हा आमचा फोटो लीक झाला तेव्हा मला कल्पना होती की पुढच्या क्षणी आमचे काय होणार आहे. त्यावेळी आम्ही घाबरून गेलो होतो. याशिवाय आता माझे लग्न झाले आहे, मुले आहेत. अजुनही थोडीफार भीती वाटते.

फोटो कसा लीक झाला याबद्दल शाहिदला सांगण्यात आले की, 'आमच्या स्टुडिओत दोन मुले आली आणि त्यांनी सांगितले की जर तुम्ही 500 रुपये दिले तर आम्ही तुम्हाला शाहीद आणि करीनाचा क्लबमध्ये किस करतानाचा फोटो देऊ.

शाहीदला ब्लॅकमेल करण्यात आलं. शाहीदने पैसे देण्यास मनाई केली आणि शाहीद - करीनाचा हा फोटो वाऱ्यासारखा पसरला' शाहीद - करीनाचं नंतर ब्रेकअप झालं.

शाहीदने मीरा राजपुत सोबत तर करीनाने सैफ अली खान सोबत लग्न केलं. दोघेही सध्या आपापल्या संसारात सुखी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Rare Otters in Sangli : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! कृष्णा नदीपात्रात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ पाणमांजरांचा कळप; 8 ते 9 पाणमांजरं दिसली एकत्र

SCROLL FOR NEXT