jersy 
मनोरंजन

शाहीद कपूरने सुरु केलं 'जर्सी' सिनेमाचं शूटींग

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- लॉकडाऊननंतर बॉलीवूडमधल्या अनेक सिनेमांचं शूट सुरु झालं. काही सिनेमांचं शूटींग संपून आता हे सिनेमे रिलीजसाठी देखील सज्ज झाले आहेत. बॉलीवूडमधील असे काही सिनेमे आहेत जे खूप चर्चेत आहेत. यातलंच एक नाव आहे ते शाहीद कपूर स्टारर 'जर्सी' या सिनेमाचं. शाहीदच्या 'जर्सी' सिनेमाची जबरदस्त चर्चा आहे. या सिनेमाची चर्चा तसं पाहायला गेलं तर आधीपासूनंच होती मात्र या सिनेमावर आता मोठ्या प्रमाणावर काम सुरु आहे. या सिनेमाचं शूटींग लॉकडाऊनमुळे थांबलं होतं मात्र आता सुरु झालं आहे.

अभिनेता शाहीद कपूर नुकताच त्याच्या आगामी सिनेमासाठी जीवतोडून मेहनत करताना दिसला. त्याने त्याच्या या मेहनतीची झलक स्वतः सोशल साईटवर पोस्ट केली आहे. यामध्ये तो क्रिकेट खेळताना दिसतोय. शाहीद कपूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यामधील एका फोटोमध्ये शाहीद क्रिकेटची प्रॅक्टीस करताना दिसून येतोय. शाहीद कपूर क्रिकेटरचा युनिफॉर्म असलेल्या जर्सीमध्ये जबरदस्त शॉट लगावतोय. शाहीदच्या हातात बॅट असून त्याच्या आजुबाजुला अनेक लोक धावत पळत आहेत.

या व्यतिरिक्त शाहीदने आणखी एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो कॅप घालून स्पोर्ट्स लूकमध्ये पूर्णपणे तयार झाला आहे. शाहीदने त्याचे फोटो शेअर करत म्हटलंय, उठा आणि चला. सगळ्यांना सुप्रभात. हॅशटॅग जर्सी. स्वप्न पाहण्यासाठी अजुन उशीर झालेला नाही. या फोटोंच्या माध्यमातून शाहीदने तो कशा प्रकारे ट्रेनिंग घेतोय हे दाखवलंय.   

shahid kapoor started shooting for upcoming film jersey shared photos playing cricket  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT