Shahid Kapoor Brutally Trolled
Shahid Kapoor Brutally Trolled  esakal
मनोरंजन

Shahid Kapoor Trolled: 'बायका नवऱ्यांना फिक्स करतात' शाहिदला लग्नाबाबत बोलणं भोवलं! नेटकरी भडकले...

Vaishali Patil

Shahid Kapoor Brutally Trolled: बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर हा त्याच्या 'फर्जी' या वेबसिरिजमुळे चांगलाच चर्चेत होता. त्याने या वेबसिरिजच्या माध्यमातुन ओटीटीवर धमाकेदार एंट्री केली. आता सध्या तो त्याच्या आगामी 'ब्लडी डॅडी' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

शाहिद सध्या त्याच्या 'ब्लडी डॅडी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही व्यस्त आहे. मात्र तो आता त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. याच मुलाखती दरम्यान दिलेले शाहिदचे विधान व्हायरल होत आहे.

याच मुलाखतीत शाहिद कपूरने लग्नाबाबत केलेल्या कमेंटमुळे त्याला चांगलचं ट्रोल केलं जात आहे. शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केले आहेत.

आता त्याच्या लग्नाला आठ वर्षे पूर्ण झाले असून या जोडप्याला दोन मुलं देखील आहे. शाहिदने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्नाविषयी त्याचे काही विचार सांगितले आहे.

यावेळी शाहिद म्हणाला की , 'लग्नाची हे सर्व फक्त एका गोष्टीवर अवलंबून आहे. मुलगा गोंधळलेला असेल तर स्त्री त्याच्या आयुष्यात येवुन त्याला सुधारते (fix) त्यामुळे त्याचं उरलेलं आयुष्य स्थिरावण्याचा आणि सभ्य माणूस बनण्याचा प्रवास असतो आणि आयुष्य हेच आहे.'

त्याला असे वाटते की लग्न म्हणजे स्त्रिया पुरुषांना ‘फिक्स’ करतात आणि त्यांना ‘सभ्य’ व्यक्ती बनवतात. थोडक्यात गडबलेल्या व्यक्तीला सावरण्यासाठी लग्न केलं केल जात असं काहीस शाहिद त्याच्या विधानात बोलला.

मात्र शाहिदचा लग्नाबाबतची ही संकल्पना अनेकांना खटकली आहे. त्याच्या या विधानामुळे त्याला खुप ट्रोल केले जात आहे.

नेटकरी त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एकानं लिहिलयं की, 'मला समजू शकतेच की तू कबीर सिंगची भूमिका केली आहेस, पण तुला असे वागण्याची गरज नाही'

तर दुसऱ्याने लिहिलयं की, त्याचे विचार तसेच आहेत म्हणुन त्याने कबीर सिंगची भुमिका साकराली होती. तर एकानं लहिलयं की, 'स्त्रिया कशासाठी आहेत? पुरुषांना फिक्स करण्यासाठी? मॅनचाईल्ड.

तर एकानं शाहिदची कानउघडणी करत लिहिलयं की, 'पुरुषाला सुधरवणं हे स्त्रीचं काम कधीच नसतं. लग्न ही पती-पत्नी दोघांवरही समान जबाबदारी आहे'

शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, शाहिद कपूर शेवटचा राज आणि डीकेच्या क्राईम थ्रिलर सिरिज 'फर्जी' मध्ये दिसला होता.

यापूर्वी त्याने 'जर्सी' या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात काम केले होते, ज्यामध्ये त्याने क्रिकेटरची भूमिका केली होती.

त्याचबरोबर आता तो 'ब्लडी डॅडी' या चित्रपटात दिसणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित ब्लडी डॅडी हा एक क्राइम थ्रिलर आहे ज्यात शाहिद कपूर, डायना पेंटी, राजीव खंडेलवाल, संजय कपूर आणि रोनित बोस रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 9 जून रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT