Shahid Kapoor 
मनोरंजन

Shahid Kapoor : अक्षयच्या पाठोपाठ आता शाहिद साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका? दिग्दर्शकासोबत सुरुये चर्चा

Shahid Kapoor : अभिनेता शाहिद कपूर एक मोठा प्रोजेक्ट साईन करणार आहे, असं म्हटलं जात आहे. या बिग बजेट प्रोजेक्टमध्ये शाहिद हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shahid Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा सध्या त्याच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं शाहिद सध्या प्रमोशन करत आहे. 'कबीर सिंग', 'पद्मावत', 'जर्सी' आणि 'हैदर' यांसारख्या हिट चित्रपटामध्ये शाहिदनं काम केलं आहे. आता शाहिद एक मोठा प्रोजेक्ट साईन करणार आहे, असं म्हटलं जात आहे. या बिग बजेट प्रोजेक्टमध्ये शाहिद हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

शाहिदची दिग्दर्शकासोबत सुरुये चर्चा

रिपोर्टनुसार, शाहिद कपूरची ओएमजी-2 या चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत आगामी बिग बजेट चित्रपटासाठी चर्चा सुरू आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अश्विन वर्दे करणार आहेत. या चित्रपटाशी संबंधित असणाऱ्या एका सूत्राने अशी माहिती दिली आहे की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी शाहिद कपूर आणि अश्विन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. योजनानुसार गोष्टी पुढे जात आहेत."

शाहिद आणि चित्रपटाचे प्रोड्युसर या प्रकल्पासाठी योग्य दिग्दर्शक शोधत होते, पण अमित राय यांच्याशी चर्चा केल्यानंतर, शाहिद कपूरला वाटले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कथा ते उत्तम पद्धतीनं मांडू शकतात.सध्या या चित्रपटासाठी निर्माते टॉप स्टुडिओशी चर्चा करत आहेत जेणेकरून चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन सुरू होईल.

भारतीय चित्रपटसृष्टीतील हा सर्वात महागडा चित्रपट?

रिपोर्टनुसार,"शाहिद कपूरने या ऐतिहासिक चित्रपटामध्ये काम करण्यास होकार दिला आहे, या चित्रपटाचं पेपर वर्क सुरु झाल्यानंतर या चित्रपटाची घोषणा केली जाणार आहे. चित्रपटाचे निर्माते सध्या अनेक टॉप स्टुडिओ आणि फायनान्सर्सशी चर्चा करत आहेत." भारतीय चित्रपटसृष्टीतील हा सर्वात महागडा चित्रपट असणार आहे, असं म्हटलं जात आहे. चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झाले नसले तरी पेपर वर्क पूर्ण होईपर्यंत नावही फायनल होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

शाहिदचा आगामी चित्रपट

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'हा शाहिदचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शाहिदसोबत कृती सेनन स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात कृती ही एका रोबोटची भूमिका साकारणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT