Dunki is First Bollywood film to be showcased in the grand hall of Le Grand Rex  Esakal
मनोरंजन

Dunki Movie: शाहरुखच्या डंकीचा थेट युरोपमध्ये डंका! नवीन रेकॉर्ड केला नावावर

'पठाण' आणि 'जवान'नंतर 2023च्या अखेरीस शाहरुख खानचा डंकी हा सिनेमा रिलिज झाला.

Vaishali Patil

Dunki Movie: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा सध्या त्याच्या हिट चित्रपटांमुळे चर्चेत आहे. आधी पठाण आणि मग जवान यानंतर 2023च्या अखेरीस शाहरुख खानचा डंकी हा सिनेमा रिलिज झाला. डंकी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

प्रेक्षक आणि समिक्षकांचाही या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. एकीकडे चांगली कमाई करत असताना आता शाहरुखच्या डंकीनं परदेशातही डंका वाजवला आहे.

शाहरुख खानचा 'डंकी' हा ख्रिसमसच्या संध्याकाळी ले ग्रँड रेक्सच्या सर्वात मोठ्या हॉलमध्ये दाखवला जाणारा पहिला बॉलीवूड हिंदी चित्रपट ठरला आहे. या सिनेमा हॉलबाहेर किंग खानच्या चाहत्यांची मोठी गर्दी केली होती.'ले ग्रँड रेक्स'मध्ये डंकीचा प्रीमियर झाला. आता सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. मात्र आत्तापर्यंत युरोपमध्ये या चित्रपटगृहात एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. 'ले ग्रँड रेक्स'मध्ये प्रदर्शित होणारा डंकी हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

यापुर्वी दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांतचा 'कबाली' हा पॅरिसमधील लोकप्रिय ले ग्रँड रेक्स येथे प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट होता. तर 'बाहुबली 2: द कन्क्लुजन'चा जगभरातील थिएटरमध्ये प्रीमियर झाला.

विजयचा बहुप्रतिक्षित 'मार्शल' हा तिसरा भारतीय चित्रपट होता. तर प्रभासचा 'साहो' हा ले ग्रँड रेक्स येथे प्रदर्शित होणारा चौथा चित्रपट होता. त्यात आता राजकुमार हिराणीचा 'डंकी' हा युरोपमधील ले ग्रँड रेक्स येथे प्रदर्शित होणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरल्याने सर्वत्र या चित्रपटाच्या टिमवर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

डंकीच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर 10व्या दिवसापर्यंत चित्रपटाने एकूण 176.47 रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर जगभरात डंकीने 340.10 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आता हा नवीन विक्रम डंकीच्या नावे झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

Solapur Rain Update:'उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस'; पंढरपुरात चंद्रभागा दुथडी, मंदिरांना पाण्याचा वेढा

Asia Cup : मी श्रेयस, यशस्वीच्या जागी असतो तर संघासाठी खेळणं सोडून...; R Ashwin कडून गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा समाचार..

SCROLL FOR NEXT