Shah rukh Khan Instagram
मनोरंजन

Shahrukh Khan Video: 'एक माणूस म्हणून शाहरुख ...', व्हायरल व्हिडीओनं किंग खान चर्चेत

शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे ज्यात सिने-इंडस्ट्रीतील अनेकांनी त्याच्याविषयी थेट मतं व्यक्त केली आहेत.

प्रणाली मोरे

Shahrukh Khan VIdeo: भारतीय चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार शाहरुख खान अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येतो. शाहरूख यशराज फिल्म्सच्या 'पठाण' चित्रपटातून तब्बल चार वर्षानंतर सिल्व्हर स्क्रीनवर कमबॅक करत आहे. पण 'पठाण' चित्रपट रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे रिलीज झाले तेव्हा पासून काही ठिकाणी 'बॉयकॉट पठाण' हा ट्रेंड चालू झाला . इतकेच नव्हेतर शाहरूख खानला त्याच्या धर्मावरनं देखील बोलले जात आहे. दरम्यान शाहरूखचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये शाहरूख हा बॉलिवूडचा बादशहा का आहे हे स्पष्ट झाले आहे.

शाहरुख खानला घेऊन आणि त्याच्या चित्रपटाला घेऊन नेहमी काही ना काही वाद होत असतात. काही वेळा त्याला देशद्रोही पण बोलेले गेले आहे,आता तर पठाण चित्रपटातील शाहरूख खान आणि दीपिका पदुकोणच्या केमिस्ट्रीला घेऊन पण बोलेले गेले.

आता शाहरूखचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये शाहरूख खान एक माणूस म्हणून कसा आहे हे बॉलीवूडमध्यील काही कलाकारांनी स्पष्ट केले आहे.

रितेश देशमुख, आलिया भट्ट, अर्जून कपूर यांनी शाहरूख खान बद्दलचं मत सांगताना "शाहरुख खान‌ सारखा नम्रपणा असणारा माणूस कोणी नाही याचा दाखला देत अनेक उदाहरणं दिली आहेत. जेव्हा आपण शाहरुखच्या घरी जातो तेव्हा ते स्वतः आपल्याला सोडायला गेट पर्यंत येतात. जर एखादी स्त्री असेल तर तिला तर ते अजुन आदर देतात. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अब्बास- मस्तान तर म्हणालेयत, 'आजच्या घडीला असा नम्रपणा असणे मोठी गोष्ट आहे'. तो व्हिडीओ बातमीत जोडलेला आहे.

सध्या शाहरूखानचे आगामी ३ चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे‌त. पठाण व्यतिरिक्त 'डंकी' आणि 'जवान' मध्ये किंग खान दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT