Shailesh Lodha Cryptic Post After Asit Modi Remarks Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Google
मनोरंजन

Taarak Mehta: निर्मात्याविरोधात शैलेश लोढांची पोस्ट, म्हणाले,'तू नेहमीच...'

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून आतापर्यंत अनेक कलाकरांनी एक्झिट घेतली आहे. पण शैलेश लोढा यांनी घेतलेल्या एक्झिटमुळे वाद रंगताना दिसत आहे.

प्रणाली मोरे

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: टी.व्ही वरची सगळ्यात प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या अनेक दिवसांपासून त्यातील कलाकारामुंळे भलतीच चर्चेत आली आहे. तारक मेहता मालिकेतून अनेक कलाकारांनी एक्झिट घेतल्यामुळे सध्या बातमी पत्राच्या हेडलाईनमध्ये ही मालिका विराजमान आहे. मालिकेत तारक मेहता ही व्यक्तिरेखा साकारणारे शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्याची बातमी गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर राज्य करताना दिसतेय. याच संदर्भात रविवारी ७ ऑगस्ट,२०२२ रोजी मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी शैलेश लोढांवर निशाणा साधत वक्तव्य केलं होतं.(Shailesh Lodha Cryptic Post After Asit Modi Remarks Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)

असित मोदी म्हणाले होते ,'नवीन तारक मेहता तर येणार, जुने परततील तर चांगलेच''. असित मोदी यांच्या या तिखट विधानावर शैलेश लोढा यांनी थेट हल्लाबोल केला नसला तरी एका इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून त्यांनीही निर्माते असित मोदींच्या कानपिचक्या घेतल्या आहेत. शैलेश लोढा यांची ही पोस्ट तारक मेहताचे निर्माते असित मोदी यांच्या वक्तव्याला दिलेलं उत्तर मात्र नक्कीच म्हणता येईल. पण आता ते नक्की कशासंदर्भात म्हटलं आहे ते लोढाच सांगू शकतील.

Shailesh Lodha Cryptic Post After Lalit Modi Remarks Tarak Mehta Ka Ooltah Chashmah

शैलेश लोढा यांनी पोस्टमध्ये नेमकं म्हटलंय काय?

शैलेश यांनी इन्स्टा स्टोरीत एक फोटो शेअर करत लिहिल आहे,- ''तुझं माझं नातं हे कायम असंच राहिलं, मी मनानंच जोडलो होतो, तू मात्र नेहमी डोक्यानं विचार केलास.#शैलेश की शैली''. ही पोस्ट लोढा यांनी हिंदीतून केली आहे. त्यांनी लिहिलं आहे, ''तेरे मेरे रिश्ते का यही एक हिसाब रहा, मैं दिल ही दिल रहा तू सदा दिमाग रहा. #शैलेश की शैली''. शैलेश लोढा यांच्या या पोस्टला चाहत्यांनी मात्र चांगलंच मानवर घेतलं आहे. चाहत्यांना शैलेश लोढा यांनी पुन्हा तारक मेहता मालिकेत परतावं असंच मनापासून वाटत आहे. निर्मात्यांसोबत जो वाद सुरु आहे तो संपवून लोढा यांनी परतावं अशी मागणी चाहते करत आहेत. शैलेश लोढा यांनी भले तारक मेहता सोडली असली तरी 'वाह भाई वाह' या शो च्या माध्यमातून ते चाहत्यांचे मनोरंजन करीत आहेत यामुळे चाहते थोडे का होईना पण समाधानी आहेत.

तारक मेहताचे निर्माते असित मोदी यांनी सांगितलं होतं की,''मला सगळ्यांना सोबत घेऊन प्रवास करायला आवडतो. पण काही जणांना माझ्या सोबत राहायचं नाही तर काय करणार, लोकांचं पोट आता भरलं आहे. त्यांना वाटू लागलंय, त्यांनी सगळं मिळवलं आहे,खूप मोठं काम करुन ठेवलं आहे. आता आणखी वेगळं करायचं आहे त्यांना''. असित मोदी यांनी स्पष्ट शब्दात जवळपास लोढांना सुनावत म्हटलं होतं की,''शो थांबणार नाही, नवीन तारक मेहता येणार. जुने परतले तर आम्हाला आनंदच आहे. लोकांचं मनोरंजन व्हावं हिच आमची इच्छा आहे, मग ते कोणी का करेना''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईत बेशिस्तपणा वाढला... राज ठाकरेंनी का घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट? सादर केला मुंबईचा विकास आराखडा

Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

Temghar Dam : टेमघर धरणग्रस्तांना दोन महिन्यांत मोबदला; न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा

Mother Daughter Drown : दुर्दैव! मुलीला बुडताना पाहून आई वाचवायला गेली अन् दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ

Birla Group: कुमार मंगलम बिर्ला स्वस्तात शेअर्स का विकत आहेत? एका वर्षापूर्वीच खरेदी केली होती कंपनी

SCROLL FOR NEXT