Taarak Mehta Ka Oolta Chashmah Controversy Esakal
मनोरंजन

Taarak Mehta: शैलेश लोढा आणि निर्माते असित मोदी वाद पोहोचला कोर्टात ... जाणून घ्या यामागचं कारण..

शैलेश लोढा यांनी 'तारक मेहता..' मालिका सोडल्यापासूनच निर्मात्यासोबत असलेलं त्यांचं वैर पोस्टच्या माध्यमातून अनेकदा समोर आलं होतं.

प्रणाली मोरे

Shailesh Lodha: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आली आहे. पण गेल्या काही वर्षांपासून या मालिकेतील काही प्रसिद्ध व्यक्तिरेखांनी एक्झिट घेतल्यानं ही मालिका चर्चेत आलेली पहायला मिळाली.

अशीच एक मध्यवर्ती व्यक्तिरेखा तारक मेहता,जी साकारात होते शैलेश लोढा. काही महिन्यांपूर्वी अचानक शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्याचं समोर आलं आणि एका वेगळ्याच वादाला तोंड फुटलं. शैलेश लोढा मालिका सोडल्यापासून चर्चेत आहेतच. आता पुन्हा एकदा त्यांचं नाव लाइमलाइटमध्ये आलंय.(Taarak Mehta Ka Oolta Chashmah Controversy)

काही दिवसांपूर्वी बातमी होती की शैलेश लोढा यांना निर्माते असित मोदी यांनी शो सोडून इतके महिने झाले तरी अद्याप पैसे दिलेले नाही. या गोष्टीला जवळपास एक वर्ष झालं. आता थेट वर्षानंतर बातमी समोर येतेय की शैलेश लोढा यांनी असित मोदी विरोधात केस दाखल केली आहे. अभिनेत्यानं आपल्या राहिलेल्या मानधनासाठी कोर्टात धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आपले पैसे शेलेश लोढा आता कायद्याच्या मदतीनं मिळवणार आहेत.

शैलेश लोढा यांच्या या केसची सुनावणी पुढील महिन्यात मे मध्ये होणार आहे. बोललं जात आहे की शो सोडल्यानंतर असित मोदी आणि शैलेश लोढा यांच्यातील संबंध फार चांगले नव्हते. दोघांमध्ये काही गोष्टींवरनं खटके उडाल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या.

अर्थात शैलेश लोढा यांनी यावर अद्याप काहीही स्पष्टिकरण दिलेलं नाही. पण असित मोदींनी मात्र यावर प्रतिक्रिया देताना मीडियासमोर म्हटलं आहे की,''मी आता काय बोलू यावर..''

असित मोदी पुढे म्हणाले,''शैलेश लोढा आम्हाला कुटुंबासारखेच आहेत. मी त्यांचा आदर करतो''. असित मोदीच्या म्हणण्यानुसार त्यांनी अनेक वेळा शैलेश लोढा यांना ऑफिसला येऊन फॉर्मॅलिटी पेपर साइन करण्यास सांगितले होते. कंपनीच्या नियमांचे पालन करून ते आपले पैसे घेऊन जाऊ शकतात. शो चे निर्मात्यांना शैलेश लोढा यांनी त्यांच्याविरोधात केलेली केस अमान्य आहे कारण त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी कधीच पैसे देण्यास नकार दिला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT