Shailesh Lodha  Esakal
मनोरंजन

Shailesh Lodha: तारक मेहता फेम शैलेश लोढाने घेतला संन्यास? फोटो व्हायरल! नेटकरी संभ्रमात

सकाळ डिजिटल टीम

सोनी टी.व्हीवर येणारा 'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका सर्वात लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचा चाहता वर्ग तगडा आहे. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सारेच या मालिकेचा आनंद घेतात मात्र या शोमधून अनेक कलाकार बाहेर पडले ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सर्वांचे मनोरंजन केले होते.

आता त्यात शैलेश लोढा यांच्याही नावाचा सामवेश आहे. तारक मेहताचं पात्र त्यांनी साकारलं आणि ते घराघरात लोकप्रिय केलं. शैलेश आणि शोच्या निर्मात्यांमध्ये बराच वाद सुरु आहे. शुल्काबाबत काही तरी गैरसमज झाला असल्याचं बोललं जात आहे. त्याचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते साधूच्या वेशात दिसत आहे.

शैलेश यांनीच त्याचा लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो एका मंदिरातील आहे जिथे शैलेश हे जमीनीवर बसून ध्यानात मग्न झालेले दिसत आहे. त्यांनी संन्याशांचे भगव्या रंगाचे कपडे घातले परिधान केले आहेत आणि त्यांच्या कपाळावर भस्मही लावले आहे. या दरम्यान ते ऐकाग्रतेने ध्यान करतांना दिसत आहे.

या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे- मनाची शक्ती द्या, मन जिंका... त्याचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि चाहते त्यावर भरपूर कमेंट करताना दिसत आहेत. काही लोकांचा असाही समज आहे की, 'शैलेश सन्यास तर घेतला नाही.

एका हिंदी वृत्त वाहिनीला मिळालेल्या बातमीनुसार शैलेश लोढा जून पासून शेमारू वाहिनीवर सुरू होणाऱ्या एका कार्यक्रमाचं निवेदन करणार आहेत. हा शो कवितांवर आधारित असणार आहे. या शो च्या माध्यमातून नव्या कवींसाठी प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शैलेश लोढा गेल्या एक आठवड्यापासून या शो चे शूटिंग करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT