Shaitaan esakal
मनोरंजन

Shaitaan Box Office Collection: 'शैतान'चा बॉक्स ऑफिसवर कब्जा; सहा दिवसात केली एवढी कमाई

Shaitaan Box Office Collection: 'शैतान' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जाणून घेऊयात या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...

priyanka kulkarni

Shaitaan Box Office Collection: अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn), ज्योतिका (Jyothika) आणि आर. माधवन (R. Madhavan) यांचा 'शैतान'(Shaitaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शुक्रवारी (8 मार्च) हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. 'शैतान' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमानं सहा दिवसात बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...

'शैतान' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Shaitaan Box Office Collection)

रिपोर्ट्सनुसार, अजयच्या शैतान या चित्रपटाने मंगळवारी भारतातील बॉक्स ऑफिसवर 6.5 कोटींहून अधिक कमाई केली होती, बुधवारपर्यंत या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 69 कोटींहून अधिक कमाई केली. आता बुधवारच्या कमाईनंतर हा आकडा 75.66 कोटींच्या पुढे गेला आहे.

शैतान या चित्रपटाने 6 दिवसात जगभरातील बॉक्स ऑफिसवर सुमारे 113 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'आर्टिकल 370' ला 'शैतान'नं टाकलं मागे

'शैतान' या सिनेमानं अवघ्या 6 दिवसांत बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत 'आर्टिकल 370' या सिनेमाला मागे टाकले आहे. 'आर्टिकल 370' या चित्रपटाने आतापर्यंत जगभरातील बॉक्स ऑफिसवर सुमारे 92 कोटी रुपयांचे कमाई केली आहे.

वशीकरवर आधारित आहे 'शैतान'

'शैतान' हा चित्रपट 'वश' या गुजराती चित्रपटाचा रिमेक आहे. 'शैतान' या चित्रपटाचे कथानक हे काळी जादू, वशीकरण यावर आधारित आहे. वाश हा कृष्णदेव याज्ञिक दिग्दर्शित केला होता तर शैतान या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहलनं केलं आहे. या चित्रपटात आर. माधवनसोबतच ज्योतिका, अंगद राज, जानकी बोदीवाला यांनी देखील भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात १८ वर्षांचा स्टार दाखल; T20 वर्ल्ड कप स्पर्धेत पठ्ठ्याने गाजवलेली एक मॅच, आता धमाल येणार

Solapur Crime News: जुन्या वादातून १८ वर्षीय सुजित राठोडचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या

Latest Marathi News Live Update: भारत हा एक महान देश आहे, सोशल मीडियावरील वादग्रस्त 'रीपोस्ट'नंतर ट्रम्प यांचे विधान

Indurikar Maharaj: नाद करता काय? इंदुरीकर महाराज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; ट्रोलर्सना दिलेलं चॅलेंज पूर्णच करणार?

IPL 2026 सुरू असताना अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, हे नव्या संघात दाखल; फ्रँचायझींचा डाव

SCROLL FOR NEXT