shaitaan movie teaser out now r madhavan ajay devgn jyotika  SAKAL
मनोरंजन

Shaitaan Teaser: जहर भी मैं.. दवा भी मैं! अजय-आर.माधवनच्या 'शैतान'चा अंगावर काटा आणणारा टिझर रिलीज

Teaser release of Ajay-R.Madhavan's 'Shaitan' ; अजय-आर.माधवनच्या 'शैतान'चा टिझर रिलीज झालाय...

Devendra Jadhav

Shaitaan Teaser News: अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका यांच्या 'शैतान'ची सर्वांना उत्सुकता आहे. काहीच दिवसांपुर्वी 'शैतान'ची घोषणा झाली. ब्लॅक मॅजिक आणि थरार यांचं मिश्रण असलेला 'शैतान'चा टिझर नुकतंच भेटीला आलाय. हा टिझर भयपटाच्या एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो आणि अंगावर काटा आणतो.

(shaitaan movie teaser out now r madhavan ajay devgn jyotika)

अजय-आर. माधवन - ज्योतिका या त्रिकूटाचा बहुप्रतिक्षित 'शैतान'चा टिझर रिलीज झालाय. विकास बहल दिग्दर्शित हा चित्रपट लोकांना खुर्चीवर खिळवून ठेवेल यात शंका नाही.

सिनेमाचा टिझर तुम्हाला शैतानच्या वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. टिझरमध्ये अजय - ज्योतिका घाबरलेले दिसतात. तर शेवटी आर माधवनच्या भयंकर हास्याने उत्सुकता चाळवते.

शैतान चित्रपट तुम्हाला भारतीय ब्लॅक मॅजिकच्या भयंकर घटकांशी संबंधित असलेल्या एका आकर्षक प्रवासात घेऊन जाईल.

जिओ स्टुडिओ, देवगण फिल्म्स आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, शैतानची निर्मिती अजय देवगण, ज्योती देशपांडे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी केली आहे.

विकास बहल दिग्दर्शित शैतान हा सिनेमा 8 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST 2.0 : नवी गाडी घेताय? जरा थांबा! सेकंडहँड गाड्याही स्वस्त, 'ही' कंपनी देत आहे २ लाखांपर्यंत सूट...

IPhone 17 Crowd: आयफोन १७ विक्री सुरू; बीकेसीच्या स्टोअरबाहेर तुफान गर्दी, रांगेत धक्काबुक्की अन् हाणामारीचा थरार!

RBI Recruitment 2025: रिझर्व बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ग्रेड-बी ऑफिसर पदासाठी १२० जागांची भरती सुरू; जाणून घ्या पगार आणि अर्ज प्रक्रिया

Latest Marathi News Updates : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन

Latur News: प्रसूतीसाठी दाखल झालेल्या माता अन् बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT