Ajay Devgn R Madhvan Shaitaan Movie 
मनोरंजन

Shaitaan Trailer : 'फक्त १५ मिनिटं थांबा माझ्या फोनची बॅटरी संपलीये'! पण त्यानंतर...'शैतान'चा ट्रेलर पाहिल्यावर तुम्हीही घाबराल

अजय देवगण, ज्योतिका आणि आर माधवन यांच्या (Shaitan Trailer ajay devgn R Madhvan) या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Shaitan Trailer: अजय देवगण अन् आर माधवनच्या शैतान नावाच्या चित्रपटाची पहिली झलक काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला असून त्यावरील नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत. बऱ्याच दिवसांपासून चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरचे वेध लागले होते.

अजय देवगण, ज्योतिका आणि आर माधवन यांच्या या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिका आहेत. आर माधवनचा नुकताच व्हायरल झालेला लूक हा त्या चित्रपटाविषयी खूप काही सांगून जाणारा होता. त्यातील त्याची भूमिका व्हिलनच्या रुपातील असून या चित्रपटाच्या निमित्तानं मॅडी वेगळ्याच भूमिकेतून आपल्या समोर येणार आहे. अजयनं त्याच्या या चित्रपटाविषयी सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

पूर्वी टीझर आणि आता ट्रेलर याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले असून या चित्रपटाला येत्या काळात प्रेक्षकांची मोठी पसंती मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.शैतानच्या ट्रेलरची सुरुवात एका घरापासून होते. ज्या घरात एक व्यक्ती बसला आहे. एक मुलगी आपल्या वडिलांना सांगते आहे की, आपल्या घरात कुणीतरी आलेलं आहे. आणि तो घराबाहेर जात नाहीये.

त्या घरात दुसरं तिसरं कुणी नसून आर माधवन आहे. तो अजय देवगण आणि ज्योतिकाच्या घरी आला आहे. तो त्या घरातून जायला तयार नाही. तो म्हणतो मला केवळ पंधरा मिनिटं थांबू द्या. माझ्या फोनची बॅटरी डेड आहे. त्यानंतर जे घडतं ते भयानक असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी ट्रेलर पाहिल्यावर वर्तवला आहे.

या चित्रपटामध्ये आर माधवननं जी भूमिका केली आहे ती एका राक्षसाची आहे. जो कुणालाही आपल्याकडील शक्तीनं वश करुन घेऊ शकतो. हा चित्रपट येत्या ८ मार्च पासून थिएटमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मात्र या सगळ्यात त्याच्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद मोठा असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT