shraddha shakti
shraddha shakti 
मनोरंजन

श्रद्धा-रोहन लग्नबंधनात अडकणार? शक्ती कपूर म्हणाले..

स्वाती वेमूल

अभिनेत्री श्रद्धा कपूर Shraddha Kapoor आणि फोटोग्राफर रोहन श्रेष्ठा Rohan Shreshtha यांच्या रिलेशनशिपच्या बऱ्याच चर्चा आहेत. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार, असंही म्हटलं जात होतं. या सर्व चर्चांवर आता श्रद्धाचे वडील आणि अभिनेते शक्ती कपूर Shakti Kapoor यांनी उत्तर दिलं आहे. रोहनने लग्नासाठी अद्याप माझ्या मुलीचा हात मागितलाच नाही, असं ते म्हणाले. श्रद्धाचा चुलत भाऊ प्रियांक शर्माच्या लग्नसोहळ्याला रोहन श्रेष्ठाने हजेरी लावली होती. "रोहन हा आमचा फॅमिली फ्रेंड आहे. त्याच्या वडिलांना मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. तो अनेकदा आमच्या घरी येतो, मात्र त्याने अद्याप लग्नासाठी श्रद्धाचा हात मागितला नाही", असं ते पुढे म्हणाले.

लग्नाविषयी शक्ती कपूर म्हणाले..

"आताची मुलं ही लग्नाचे निर्णय स्वत:च घेतात. श्रद्धा किंवा सिद्धांतने मला सांगितलं की त्यांनी त्यांचा जोडीदार निवडला आहे, तर मी लगेच त्यांना होकार देईन. मी त्यांना नकार देण्याचं काही कारणच नाही. पण सध्या ते त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत आहेत. लग्न हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहे. सध्या ज्या वेगाने लोकांचे ब्रेकअप्स होतात, घटस्फोट होतात, ते पाहून मला जरा काळजी वाटते. लग्नाचा निर्णय घेण्यासाठी व्यक्तीने जोडीदाराबाबत ठाम राहिलं पाहिजे", असं मत शक्ती कपूर यांनी मांडलं.

रोहन आणि श्रद्धा या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. मार्च महिन्यात एका रेस्टॉरंटमध्ये या दोघांना एकत्र पाहिलं गेलं होतं. श्रद्धाच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक निर्णयांना माझा पूर्ण पाठिंबा असल्याचं शक्ती कपूर यांनी सांगितलं. "आपली स्वप्नं पूर्ण करण्यापासून मी श्रद्धा किंवा माझा मुलगा सिद्धांत यांना कधीच थांबवलं नाही. अनेकदा मला विचारलं जातं की मी श्रद्धाला अभिनेत्री बनण्यापासून थांबवलं का? पण हे खरं नाही. तिने प्रगती करावी, अशीच माझी इच्छा आहे. ती खूप मेहनती आणि प्रतिभावान मुलगी आहे. तिच्या स्वत:च्या बळावर नाव कमावलंय", असं ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT