Mukesh Khanna news esakal
मनोरंजन

Mukesh Khanna: 'सुपरमॅन हनुमानाची कॉपी, शक्तिमानची सुरुवात महाभारतापासून!'

शक्तिमान या मालिकेविषयी फारसं कुणाला काही सांगण्यासारखं नाही. त्याचे कारण तिची लोकप्रियता सर्वांना माहिती आहे.

युगंधर ताजणे

Shaktiman Movie: शक्तिमान या मालिकेविषयी फारसं कुणाला काही सांगण्यासारखं नाही. त्याचे कारण तिची लोकप्रियता सर्वांना माहिती आहे. सध्या (tv entertainment news) शक्तिमान मालिकेवर चित्रपट निर्मिती केली जाणार आहे. त्यावरुन शक्तिमान मालिकेत ज्या अभिनेत्यानं प्रमुख भूमिका साकारली होती त्या मुकेश खन्ना यांनी आतापासून वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली (Mukesh khanna) आहे. आता शक्तिमानच्या मेकर्सनं चित्रपटाची घोषणा करुन एक मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

व्हिएफएक्स, लक्ष वेधून घेणाऱ्या आवाजात तो व्हिडिओ सुरु होतो. त्यात एक (Holywood news) संवाद कानी पडतो. जो 25 वर्षांपूर्वी टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या शक्तिमान मालिकेतील आहे. "जैसे ही अंधकार और बुराई मानवता पर हावी हो जाती है...उसके लौटने का समय आ गया है।" हा तो संवाद आहे. तो सध्या (Hollywood Movies) सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. यासगळ्यात शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत शक्तिमानची तुलना आर्यनमॅनशी केली आहे. त्यात त्यांनी आयर्नमॅनपेक्षा शक्तिमान हा कधीही श्रेष्ठच आहे. असे म्हटले आहे.

याशिवाय मुकेश खन्ना यांनी आयर्नमॅन आणि स्पायडरमॅनची तुलना शक्तिमानसोबत केली आहे. शक्तिमानवर आधारित चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया आता सुरु झाली आहे. चाहत्यांना या चित्रपटाचे वेध लागले आहे. सोनी पिक्चर्सच्या वतीनं त्याची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मुकेश खन्ना यांनी एक व्हिडिओ शेयर करुन आपल्या शक्तिमानविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मुकेश खन्ना त्या व्हिडिओमध्ये म्हणतात, कल्चर, स्टोरी आणि पुराणकथा यांचे कनेक्शन फार पूर्वीपासून आहे. जगातील कोणत्याही सुपरहिरोजवळ एवढी मोठी स्टोरी नाही जेवढी शक्तिमानजवळ आहे. त्यामुळे आपला हिरो हा त्यांच्यापेक्षा वरचढच आहे. आपण ते लक्षात घेण्याची गरज आहे. शक्तिमानची सुरुवात महाभारतापासून झाली होती. आणि आता जे हिरो आपल्यासमोर येतात ते कोणत्यातरी ग्रहावरुन. एखाद्याला स्पायडर चावला म्हणजे तो लगेच स्पायडर मॅन. यासगळ्यात शक्तिमान प्रभावी आहे. असे खन्ना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT