shakuntala devi 
मनोरंजन

'मैं कभी हारती नहीं' म्हणत विद्या बालनची 'शकुंतला देवी' करतेय प्रेक्षकांवर जादू.. पाहा ट्रेलर

दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- अभिनेत्री विद्या बालनच्या आगामी 'शकुंतला देवी' सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. प्रसिद्ध गणितज्ञ आणि जगभरात 'ह्युमन कॉम्प्युटर' अशी ओळख असलेल्या शकुंतला देवी यांच्यावर हा सिनेमा आधारित आहे. विद्या बालनने सकाळपासूनंच सोशल मिडियावर चाहत्यांना वेगवेगळी गणिताची कोडी देत चक्रावून टाकलं होतं. अखेर तिच्या भूमिकेची झलक आता प्रेक्षकांसमोर आली आहे. विद्याचा बहुचर्चित 'शकुंतला देवी' या सिनेमाचा ट्रेलर काही वेळापूर्वीच रिलीज झाला आहे.

प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवी यांच्यावर आधारित असलेल्या सिनेमात विद्या बालन मुख्य भूमिकेत असून सन्या मल्होत्रा तिच्या मुलीच्या भूमिकेत आहे. विद्याचा अनोखा अंदाज या सिनेमात पाहायला मिळतोय. आधीच्या सिनेमांपेक्षा विद्याची ही वेगळी भूमिका आहे. तसंच ट्रेलरमध्ये तिचं पात्र पाहिल्यावर तिचे चाहते तिच्या अभिनयाच्या प्रेमात पडले आहेत.

या सिनेमाची कहाणी देखील प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी आहे. ज्या व्यक्तीला या संपूर्ण जगाने सन्मान दिला, प्रेम दिलं ती तिच्या स्वतःच्याच मुलीच्या नजरेत का पडते? तिचं तिच्या पतीसोबत केवळ मुल जन्माला घालेपर्यंतंचच नातं असतं का? मग नेमकी तिला अशी कोणाची साथ मिळते ज्यामुळे ती केवळ भारताचं नाव अख्ख्या जगात उज्वल करत नाही तर कॉम्प्युटरला देखील हरवत गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये स्वतःच्या नावाचा ठसा उमटवते?

या सिनेमात सन्या मल्होत्रासोबत जिशू सेनगुप्ता पडद्यावर झळकणार आहे. हे एक सरप्राईज पॅकेज असू शकतं तसंच अमित साधसुद्धा यात कमाल करेल असंचं दिसतंय. म्हणूनंच शकुंतला देवी यांच्या वैयक्तिक आयुष्यातील चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी पडद्यावर आणणं इतकंच नाही तर आई म्हणून परिपूर्ण नसणं यासाठी दिग्दर्शक अनु मेनन यांच्या प्रामाणिकपणाला दाद दिली पाहिजे. विद्या बालनचे चित्रविचित्र हाव भाव तिचा खोडसाळपणा पाहून हा सिनेमा पाहताना प्रेक्षकांना मजा येईल असंच दिसतंय.

'मैं कभी हारती नही ऑलवेज रिमेंमबर दॅट' असं म्हणणा-या शकुंतला देवी इथे त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स दर्शवतात जसं त्यांनी त्यांच्या आयुष्यात इंदिरा गांधी यांच्या विरोधात लोकसभा निवडणुक लढवून मोठी चूक केली होती.   

shakuntala devi official trailer release vidya balan sanya malhotra  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

Mira-Bhayandar: तो हिंदी भाषिक व्यापारी नडला म्हणून मनसे कार्यकर्ता भिडला, 'त्या' व्हायरल व्हिडिओमागची स्टोरी काय?

SCROLL FOR NEXT