Shamita Shetty and Raqesh Bapat break up.. Google
मनोरंजन

शमिता शेट्टी-राकेश बापटचं ब्रेकअप; वेगळं होण्यासाठी कुणी उचललं पहिलं पाऊल?

शिल्पा शेट्टीच्या वाढदिवशी आज ८ जून रोजी तिची बहिण शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या ब्रेकअपची बातमी समोर येतेय.

प्रणाली मोरे

शिल्पा शेट्टीच्या(Shilpa Shetty) वाढदिवशी आज ८ जून रोजी तिची बहिण शमिता शेट्टी(Shamita Shetty) आणि राकेश बापट(Raquesh Bapat) यांच्या ब्रेकअपची बातमी समोर येतेय. बिग बॉस ओटीटी पासून या दोघांमध्ये सुरु झालेल्या प्रेमाचा आता द एन्ड झालाय आणि दोघांचे रस्ते आता वेगळे झाले आहेत. फिल्मफेअरच्या एक्सक्लुसिव्ह रिपोर्टनुसार असं दिसून आलं आहे की आता दोघांनी एकमेकांच्या सहमतीनं आपल्या रोमॅंटिक नात्याला बाय-बाय म्हटलं आहे.(Shamita Shetty and Raqesh Bapat break up..)

रिअॅलिटी शो दरम्यान ते प्रेक्षकांच्या फेव्हरेट कपलमध्ये टॉपवर होते. लोकांनी त्यांच्यामधील प्रेमाला आणि बॉन्डिंगला खूप पसंत केलं. शो संपल्यानंतर देखील ते अनेक इव्हेंट्समधून एकत्र दिसले. राकेश शमिताच्या कुटुंबासोबतही अनेकदा दिसला आहे. कॅमेऱ्यासमोर दोघांमधील प्रेमाचा गोडवा खूपच बहरायचा हे सगळ्यांनीच पाहिलंय. त्यामुळे दोघांमध्ये झालेला हा ब्रेकअप चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्काच आहे.

शमिताच्या जवळच्या सूत्रांनुसार दोघांनी एकमेकांच्या सहमतीनं आपल्यासाठी वेगळ्या वाटा निवडल्या आहेत. ते दोघे वेगळे झाले असले तरी एकमेकांप्रती त्यांच्या मनात मैत्री आणि सम्मान कायम असेल असं सूत्रांचे म्हणणे आहे. दोघं कायम एकमेकांचे मित्र असतील असं देखील सूत्रांनी म्हटलं आहे. राकेश आणि शमितानं नुकतंच एका म्युझिक अल्बमचं शूटिंग पूर्ण केलं आहे,जो लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. किमान या माध्यमातून चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री स्क्रीनवर पहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT