Shamita Shilpa 
मनोरंजन

शिल्पा शेट्टीच्या बहिणीच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

राज कुंद्राची न्यायालयीन कोठडीत रवानगी

स्वाती वेमूल

अश्लील चित्रफितनिर्मिती प्रकरणी उद्योजक व अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती राज कुंद्रा Raj Kundra न्यायालयीन कोठडीत आहे. कोर्टाने कुंद्राचा जामिन अर्ज फेटाळला आहे. यादरम्यान आता शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी Shamita Shetty हिने एक ट्विट केलं आहे. याआधीही शमिताने राज कुंद्राच्या अटकेनंतर कठीण काळात बहिणीसाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिला आधार देण्याचा प्रयत्न केला होता. 'ही वेळसुद्धा निघून जाईल', असं त्यात शमिताने म्हटलं होतं. (Shamita Shetty shares a cryptic post amidst Raj Kundras slv92)

काय आहे शमिताचं नवीन ट्विट?

'कधी कधी तुमच्यातील ताकद म्हणजे सर्वांना पाहता येऊ शकणारी मोठी ज्वाला नसते. ती एक छोटीशी ठिणगी असते जी हळूच तुमच्या कानात तुम्हाला सांगते, 'समजलं का.. पुढे चालत रहा'. लोक तुमची ऊर्जा कशाप्रकारे घेतील यावर तुमचं नियंत्रण नसतं. त्या घडीला लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात जे घडत असतं त्या नजरेतूनच ते तुमच्या बोलण्या-वागण्याकडे पाहतात. जे तुमच्याविषयी अजिबात नसतं. तुम्ही एकाग्रतेने आणि प्रेमाने पुढे चालत रहा', अशी पोस्ट शमिताने लिहिली आहे.

शिल्पाचा 'हंगामा २' हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होणार होता, तेव्हासुद्धा शमिताने खास पोस्ट लिहिली होती. '१४ वर्षांनंतर तुझा 'हंगामा' हा चित्रपट प्रदर्शित होतोय. त्यासाठी तुला खूप शुभेच्छा. मला माहितीये, तू आणि चित्रपटाच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुझ्यासोबत नेहमी राहीन. आयुष्यात तू अनेक चढउतारांचा सामना केलास आणि एक गोष्ट मी ठामपणे सांगू शकते की त्यातून तू खंबीरपणे वर आलीस. ही वेळसुद्धा निघून जाईल. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा', असं तिने म्हटलं होतं.

काय आहे राज कुंद्रा प्रकरण?

राज कुंद्राने आर्म्स प्राइम मीडिया ही कंपनी स्थापन केली होती. त्याद्वारे त्याने 'हॉटशॉट' हे अॅप लाँच केलं होतं. हे अॅप लंडन इथल्या केनरिन या कंपनीला विकले होते. मात्र राज कुंद्राच्या विआन इंडस्ट्रीज या कंपनीच्या माध्यमातून हे अॅप चालवले जात होते. या अॅपद्वारे पॉर्न चित्रफितींची निर्मिती आणि प्रसारण केले जात होते, असा आरोप आहे. शिल्पा शेट्टीसुद्धा विआन इंडस्ट्रीज कंपनीत एक संचालक होती. त्यामुळे या गुन्ह्यात शिल्पा शेट्टीचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : हे व्यवस्थेचं अपयश, अशा निवडणुका बघितल्या नाही! निकाल पुढे ढकलल्यानं मुख्यमंत्र्यांची नाराजी; आयोगाच्या कार्यपद्धतीवर ओढले ताशेरे...

Malegaon Crime : मालेगाव हादरले! एकाच दिवशी अल्पवयीन मुलींवरील विनयभंगाचे तीन गुन्हे दाखल; समाजमनात संतापाची लाट

मोठी बातमी! नगरपरिषद-पालिका निवडणुकांची मतमोजणी पुढे ढकलली! नवी तारीख जाहीर, कोर्टाने काय म्हटलं?

Pune Metro : स्वारगेट-कात्रज मेट्रोची निविदा मंजूर; तीन महिन्यांत कामाला होणार सुरुवात

Dhananjay Munde : धनुभाऊ तुमचा इंदौरमध्ये खून झाला असता पण... धनजंय मुंडे यांच्याबाबत आमदाराचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT