shamita shetty Sakal
मनोरंजन

Shamita Shetty: 'इंडस्ट्रीत काम मिळेना'...शमिता शेट्टी म्हणाली, "खूप कठीण..."

चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये मिळणाऱ्या विविध संधींमुळे शमिता शेट्टीच्या करिअरला वेग आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

कधी-कधी प्रतिभा असूनही कलाकारांना काम सहजासहजी मिळत नाही. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री शमिता शेट्टीसोबत घडला आहे. अनेकवेळा चांगल्या प्रोजेक्टसाठी तिला दोन-तीन वर्षे वाट पाहावी लागली. नुकतीच शमिता 'द टेनंट' चित्रपटात दिसली आहे.

लोक याला शमिताची दुसरी इनिंग म्हणत आहेत. तिचाही असा विश्वास आहे का? यावर शमिता म्हणते, 'माझा यावर विश्वास नाही. प्रत्येक वेळी माझा एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की लोक माझ्याबद्दल असेच बोलतात. मी किती वेळा परत येईन. माझ्या चित्रपटांच्या प्रदर्शनात अंतर आहे कारण चांगल्या ऑफर्स आल्या नाहीत. का आल्या नाहीत हे मला माहीत नाही, जे पण येत होतं, त्यातून सर्वोत्तम निवडून मी काम करत होते.

शमिताने कारण शोधण्याचा प्रयत्न केला नाही का? यावर ती म्हणते, "अर्थात मी प्रयत्न केला. मी माणूस आहे, मलाही वाटायचं की असं का होतंय. मी बराच काळ उदास होते. मी कठीण काळातून गेले आहे, ळ असते. कदाचित हीच माझी योग्य वेळ असेल आता चांगले विषय माझ्याकडे येत आहेत.

मला आशा आहे की या युगात जिथे खूप काम आहे, मला पुढच्यापण हे असेच लिहिले होते.कदाचित त्या संघर्षमय दिवसांमुळेच मी आज इतकी खंबीर आहे. प्रत्येक अनुभवासाठी मी तुमची आभारी आहे. प्रत्येक गोष्टीची एक वे प्रोजेक्टसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही".

अलीकडे इंटरनेट मीडियावर शमिता रिलेशनशिपमध्ये असल्याची बरीच चर्चा झाली होती. यावर शमिता म्हणाली, "हो, मला नक्कीच लोक जज करतात. जर तुम्ही माझ्या इंटरनेट मीडिया पेजवर गेलात तर तुम्हाला दिसेल की लोकांनी मला किती वेळा जज केले आहे. तू लग्न का करत नाहीस, लग्नाचे वय गाठले आहेस, म्हातारी होत आहेस, तुला कोणी भेटत नाही का, असे लोक लिहितात.

कधी कधी असे वाटते की माझा जन्म फक्त लग्न करण्यासाठी झाला आहे. मुलीचे लग्न झाले नाही तर जणू गुन्हाच आहे. लोकांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. याच कारणामुळे मला बिग बॉस शोमध्येही जावे लागले, जेणेकरून मी कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे हे लोकांना समजावून सांगू शकेन.

काही लोकांनी मला समजून घेतले आणि प्रेमही दिले. मला वाटतं, जर तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल, तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना तुम्ही बरोबर आहात हे माहीत असेल, तर स्वतःवर विश्वास ठेवा".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT