Shamita Shetty, Abhijit Bichkule Google
मनोरंजन

'बिचुकले' हे काय आडनाव आहे;शेट्टींच्या शमिताला 'मराठी' नावाचे वावडे!

'बिग बॉस १५' मध्ये उडवली मराठी आडनावावरुन अभिजितची खिल्ली...

प्रणाली मोरे

'बिग बॉस'चं घर म्हणजे रोज नवीन रंगवलेलं नाटक पहायला हमखास मिळणार याची हमी. इथे पडदा उठला की कुणीतरी काहीबाही बरळायची खोटी की वाद पेटलाच म्हणायचा. कधी कुणाचंतरी काही खटकतं म्हणून रुसवे-फुगवे होतात तर कधी एकमेकांविरोधात केलेल्या गॉसिपवरनं ठिणगी पेटते,तर कधी उगाचच काटे की टक्करवाला स्पर्धक बाद करायचा म्हणून वाद घडवून आणला जातो. हे कमी म्हणून की काय मग 'विकेंड च्या वारा'ला सलमान खानची उगारली जाणारी शब्दांची छडी या नाटकाला अधिक रंजक बनवते. यंदा 'बिग बॉस १५'च्या सीझनला नेहमीप्रमाणे मसाला भरण्यात शो चे निर्माते कुठेही मागे पडले नाहीत पण हवा तसा रीस्पॉन्स मिळत नसल्याने शो चा टीआरपी कमी होत होता. त्यामुळे व्ही.आय.पी गेस्ट म्हणून रश्मी देसाई,राखी सावंत व तिचा नवरा रितेश आणि मराठी बिग बॉसमुळे फेममध्ये आलेला अभिजित बिचुकले अशा सगळ्यांना एकत्रित आणण्यात आले.

या गेस्टच्या जमवाजमवीनंतर शेवटी अखेर मोठा भडका उडालाच म्हणायचा. तर हा भडका उडालाय बिचकुले आणि शमिता शेट्टी(Shamita Shetty) मध्ये. तसं पाहिलं तर शमिताच्या चेह-यावर नेहमीच तिला असलेला इगो दाटून आलेला पहायला मिळतो. आता हा इगो तिला नेमका कोणत्या कारणामुळे आहे हे मात्र कळत नाही. कारण स्वतः करिअरमध्ये फार काही केलंय ग्रेट तर तसंही नाही. म्हणजे शिल्पा शेट्टीची बहीण अशीच अजूनही तिची ओळख आणि हेच तिचं सगळ्यात मोठं अॅसेट म्हणावं लागेल. आता तर चक्क तिने ''बिग बॉस १५' मध्ये आलेला स्पर्धक अभिजित बिचुकलेचं नाव खूप कठीण आहे यावरनं गॉसिप करत सगळ्यांसमोर त्याची खिल्ली उडवली. यावरनं दोघांमध्ये वाद पेटला आणि दोघंही रागानं घर सोडून जाणार असं जाहीर करून बसले.

त्याचं झालं असं की,शमितानं सलमानकडे अभिजितची तक्रार करताना म्हटलं की, ''हा मला पैर की जुती' म्हणाला. आणि हीन दर्जाचे शब्द मला वापरले. हा का आलाय इथे?'' बरं हे सगळं बोलताना तिनं अभिजित बिचकुलेचं नाव नं घेता सगळे आरोप केले. जेव्हा सलमान म्हणाला, ''त्याचं नाव का घेत नाहीस?''. तेव्हा त्याचं नाव म्हणजे काहीतरी किळसवाणं असं आहे असे हावभाव चेह-यावर आणून ती म्हणाली,''त्याचं नाव कसं आहे.मला ते उच्चारताना त्रास होतो''. यावरनं सलमानने तिला बरंच सुनावलं. तसंच अभिजितचं आडनाव हे त्याच्या गावाच्या नावावरंन आहे तेव्हा त्या संपूर्ण गावाचा अपमान तुझ्या अशा बोलण्यामुळे होतोय. सलमानचे हे कडक बोल ऐकून शमिताने आपण शो सोडून जातो असं काही झालं असेल तर असे वक्तव्य केले. तर शमिताने गावाचा अपमान केल्यामुळे आपणही 'बिग बॉस१५'च्या शो मध्ये राहणार नाही असं अभिजित बिचुकले म्हणाला. हा सगळा वाद आजच्या भागात आपल्याला पहायला मिळेल.या भागात सारा अली खानही 'अतरंगी रे' च्या गाण्यावर सलमानसोबत थिरकताना दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT