Shanaya Kapoor Bollywood Debut
मनोरंजन

शनाया कपूरची बॉलीवूडमध्ये 'बेधडक' एंट्री

सकाळ डिजिटल टीम

शनाया कपूरने अखेर तिचा पहिला चित्रपट 'बेधडक'ची घोषणा केली. ती म्हणाली, ''धर्मा प्रॉडक्शनमध्ये (Dharma Productions) संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे.''

संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) हिने करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन कडून तिचा मोठा डेब्यू प्रोजेक्ट बेधडक ची घोषणा केली आहे. या चित्रपटात ती अभिनेता लक्ष्य (Lakshya) सोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय कपूर (Sanjay Kapoor) आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूरने अखेर तिच्या डेब्यू प्रोजेक्टची पुष्टी केली आहे. करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शन उपक्रमांतर्गत ही स्टार किड तिचा मोठा डेब्यू करणार आहे. या सुंदर दिवाने गुरुवारी सकाळी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट 'बेधडक' जाहीर केला. तिच्या व्यक्तिरेखेसह तिच्या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करताना, शनायाने लिहिले, “शशांक खेतन दिग्दर्शित 'बेधडक' (Bedhadak) सह धर्म परिवारात सामील होण्यासाठी मी अत्यंत कृतज्ञ आणि नम्र आहे. मी या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी खूप उत्सुक आहे, मला तुमचे आशीर्वाद आणि प्रेम हवे आहे!" (Shanaya Kapoor finally announces her debut film Bedhadak)

शनाया लक्ष्यसोबत काम करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतन (Shashank Khaitan) करणार आहे. या चित्रपटात शनाया निम्रतची भूमिका साकारणार आहे. शनायाने तिच्या पदार्पणाची घोषणा करताच, सेलिब्रिटींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. वडील संजय कपूर यांनी लिहिले, "लव्ह यू." (Bollywood Debut)

चित्रपट निर्माता करण जोहरने त्याच्या इंस्टाग्रामवर बेधडकची घोषणा केली आणि लक्ष्यचे पोस्टर शेअर केले.

बेधडकसोबत करणने दोन नवोदित कलाकारांना इंडस्ट्रीत आणले आहे. बेधडक हा रोम-कॉम स्पेसमधील लव-ट्रायंगल असल्याच्या बातम्या यापूर्वी आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

Anant Nag: दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना फाळके सन्मान, पंतप्रधानांनी ट्वीट करुन दिल्या शुभेच्छा

Kolhapur Crime: डॉ. सोनल वालावलकरला गर्भलिंग निदानप्रकरणी मोका, हॉस्पिटलवर छापा; डॉक्टर पसार

SCROLL FOR NEXT