dil chahata hai 
मनोरंजन

एका गाण्यासाठी तब्बल 21 देशातील 112 कलाकार आले एकत्र, या गाण्याचा व्हिडिओ तुम्ही पाहाच...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 'दिल चाहता है'  चित्रपट 2001 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा तीन मित्रांची होती. ज्यामध्ये अभिनेता आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता फरहान अख्तरने केले होते. या चित्रपटातील 'दिल चाहता है...' हे गाणं तेव्हा तुफान गाजलं होत. आता गायक शंकर महदेवन यांनी हेच गाणं 'बकर्ली इंडिया इन्सेबल' या म्युझिक स्कूलसोबत एकत्र येऊन रिक्रिएट केले आहे. हे गाणं रिक्रिएट करण्यामागचा उद्देश म्हणजे लोकांना घरीच राहा सुरक्षित राहा असे सांगणे आहे. 

तसेच याचा आणखी एक उद्देश म्हणजे लॉकडाऊनमुळे ज्यांच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे, अशा मनोरंजन क्षेत्रात स्ट्रगल करणारे कलाकार आणि ज्युनिअर आर्टिस्ट यांना मदत करणे हा आहे. विशेष म्हणजे या गाण्यासाठी या चित्रपटातील कलाकार अभिनेता आमिर खान आणि फरहान अख्तर यांच्यासोबत 21 वेगवेगळ्या देशातील 112 कलाकार एकत्र आले आहेत.

'दिल चाहता है'च्या रिक्रिएट व्हर्जनची सुरवात आमिर खानच्या एका मॅसेजने होते. गाण्याच्या सुरवातीला आमिर म्हणतो, 'आजवर जेवढे चित्रपट मी केले आहेत त्त्या चित्रपटांतील गाण्यांपैकी 'दिल चाहता है' हे गाणं माझं सगळ्यात जास्त आवडतं आहे. शंकर, एहसान लॉय यांनी हे गाणं खूप सुंदररित्या संगीतबद्ध केले आहे आणि जावेद अख्तर यांनी लिहिले आहे. मी हे ऐकून खूप आनंदी झालो की 'बकर्ली इंडिया इन्सेबल' म्युझिक स्कूल यांनी हे गाणं रिक्रिएट केले आहे. या गाण्यातून जो निधी जमा केला जाईल त्यातून ज्युनियर कलाकारांना मदत केली जाणार आहे. या सगळ्यांच्या समस्या लवकरात लवकर दूर झाल्या पाहिजेत. माझं मन सांगतेय की पुन्हा एकदा ते सुंदर दिवस परत येतील'.आमिरच्या या मेसेजनंतर गाणं सुरू होतं.

या रिक्रिएट व्हर्जनमध्ये 21 देशातील 112 कलाकार ज्यामध्ये संगीतकार, कलाकार  बकर्ली इंडिया इन्सेबल म्युझिक स्कूलचे काही विद्यार्थी एकत्र आले आहेत. या गाण्यामध्ये अभिनेता आमिर खान, फरहान अख्तर, गायक शंकर महादेवन, महान तबला वादक झाकीर हुसेन, संगीतकार सलीम-सुलेमान, गायक बेनी दयाल, गायिका सुनिधी चौहान यांसारखे बरेच कलाकार सहभागी झाले आहेत.

यामध्ये सहभागी झालेले सर्व जण हातात एक महत्त्वाचा आणि सकारात्मक संदेश देणारे पोस्टर घेऊन उभेआहेत. कोरोना विषाणूमुळे देश लॉकडाऊनमध्ये असून देश सध्या आरोग्यापासून ते आर्थिक समस्यांची लढाई लढत आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूड कलाकार सतत त्यांच्या परीने मदतीचा प्रयत्न करीत आहेत. नुकतेच 'आय फॉर इंडिया'च्या माध्यमातून निधी जमा केला आहे. हादेखील एक प्रयत्न आहे. 

shankar mahadevan and berklee indian ensemble recreate dil chahta hai title track

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT