Shankar Mahadevan News Google
मनोरंजन

गायक शंकर महादेवनची मोठी घोषणा; गाणार 'ब्रेथलेस हनुमान चालिसा'

शंकर महादेव यांनी काही वर्षांपूर्वी गायलेलं एक ब्रीथलेस गाणं चाहत्यांचा खूप पसंतीस उतरलं होतं.

प्रणाली मोरे

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक(Music Director) आणि गायक शंकर महादेवन(Shankar Mahadevan)हा नेहमीच संगीतात हटके प्रयोग करताना दिसला आहे. खरं त्यानं जे काही काम संगीतक्षेत्रात केलं आहे ते उल्लेखनीय आहे. काही वर्षांपूर्वी शंकरनं संगीतात एक अभिनव प्रयोग करत 'ब्रेथलेस' ही नवी संकल्पना आणली होती आणि अल्बम रिलीज केला होता. आता त्याच धर्तीवर शंकर महादेवन हनुमान चालीसा गाताना दिसणार आहे. शंकरने याची घोषणा क्रु अॅपच्या माध्यमातून केली आहे. त्याच्या त्या व्हिडीओला शेमारु भक्तीच्या अकाऊंटवरनं शेअर करण्यात आलं आहे. (Shankar Mahadevan News)

या व्हिडीओच्या माध्यमातून शंकर म्हणताना दिसतोय की,''त्याला अद्भुत हनुमान चालिसा गाण्याची संधी मिळाली आहे. हे गाणं देखील मी ब्रेथलेस स्टाईलमध्येच गाणार आहे. या गाण्याचा गातानाचा वेग जास्त आहे आणि खूप कठीण आहे. याच व्हिडीओत शंकरने हनुमान चालिसाविषयी आपल्याला काय वाटतं ते विचारही मांडले आहेत. ही अनोखी हनुमान चालिसा शेमारु भक्ती के यु-ट्यूब चॅनलवर दाखवलं जाणार आहे''.

शंकर महादेवनचा ब्रेथलेस अल्बम १९९८ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये त्याच्यासोबत जावेद अख्तर देखील होते. त्यानं या अल्बमचं टायटल ब्रेथलेस पद्धतीत गायलं होतं. ब्रेथलेस गाण्यात न थांबता गायचा गाण्याचा भाग जवळ-जवळ ३ मिनिटाचा होता. सिनेसंगीतात महादेव यांनी खूप वर्ष काम केलं आहे. एहसान आणि लॉय या दोन संगीतकारांसोबत मिळून त्यांनी कितीतरी सिनेमाला हीट संगीत देण्याची धुरा सांभाळली आहे. यामध्ये मिशन काश्मिर,दिल चाहता है.लक्ष्य,बंटी और बबली,डॉन,रॉक ऑन जशा कितीतरी सिनेमांचा समावेश आहे. हनुमान चालिसाविषयी जर बोलायचं झालं तर कितीतरी कलाकारांनी आणि संगीतकारांनी आपल्या पद्धतीनं हनुमान चालिसा रेकॉर्ड केली आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांचादेखील समावेश आहे. या सर्व कलाकारांनी गायलेल्या हनुमान चालिसा खुप लोकप्रिय झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Australia: IND मध्ये रंगणार AUS vs ENG कसोटी? क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या CEO ने दिले मोठे संकेत; BCCI सोबत चर्चेची शक्यता

ऐकावं ते नवलंच! तो पत्नीवर २० वर्ष रुसला, एकही शब्द नाही बोलला; कारण काय तर...

मोठी बातमी! CJP च्या दोन मागण्या सरकारकडून मान्य, तिसरीसाठी उद्या पर्यंतची मागितली वेळ, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

Ashadhi Ekadashi Special: १५ मिनिटांत बनवा कुरकुरीत आणि चटपटीत 'उपवासाची कचोरी'!

WI vs PAK Test: वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध कसोटी खेळण्यास दिला नकार! प्रशिक्षक डॅरेन सॅमीने सर्व काही खरं सांगितलं

SCROLL FOR NEXT