Shantipriya Bollywood Actress Comment On Akshay esakal
मनोरंजन

Akshay Kumar : अक्षय धुतल्या तांदळाचा नाही, बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीला त्यानं...

सोशल मीडियावर बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

युगंधर ताजणे

Shantipriya Bollywood Actress Comment On Akshay : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे.गेल्या तीन दशकांहून अधिक काळ या अभिनेत्यानं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. बॉलीवूडमध्ये अक्षयचा चाहतावर्गही मोठा आहे.

बॉलीवूडमधील जे कुणी दिग्गज अभिनेते आहे त्यातील बऱ्याचजणांचे नाव हे त्यावेळच्या लाईमलाईटमधील अभिनेत्रींशी जोडले गेले. त्यात अक्षय कुमारचेही नाव घ्यावे लागेल. सगळ्यात पहिल्यांदा त्याचे नाव रविना टंडनशी जोडले गेले. त्यानंतर रेखासोबतही अक्षय नेहमीच गप्पांचा विषय होता. मग राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी ट्विंकल खन्नासोबत त्याचे प्रेमप्रकरण सुरु झाले होते.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

यासगळ्यात एका अभिनेत्रीनं अक्षयवर केलेली टीका आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्या अभिनेत्रीनं अक्षयला तुम्ही समजता तितका तो चांगला नाही. त्यानंही काही गोष्टी चुकीच्या केल्याचे म्हटले आहे. शांतीप्रिया असे त्या अभिनेत्रीचे नाव आहे. १९९४ मध्ये तिनं अक्षयसोबत इक्के पे इक्का नावाची फिल्म केली होती. शांती प्रियानं त्या चित्रपटाच्यावेळी तिला जे अनुभव आले त्याविषयी सांगितले आहे.

शांतीप्रिया म्हणते, अक्षय मला त्यावेळी माझ्या रंगावरुन बोलला होता. त्या गोष्टीचे मला खूपच वाईट वाटले होते. त्याच्यासारख्या अभिनेत्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. बऱ्याच दिवस मी त्याच्याशी बोलले देखील नाही. माझ्या रंगावर आणि दिसण्यावर त्यानं टिप्पणी करुन माझा अपमान केल्याची शांतीप्रियानं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे. यामुळे अक्षय कुमार देखील बाकीच्या अभिनेत्यांसारखाच आहे. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियातून समोर येत आहेत.

अक्षयचा आणि माझा क्लायमॅक्सचा सीन सुरु होता. त्यावेळी मी छोटा ड्रेस परिधान केला होता. यावेळी अक्षयनं माझ्याकडे पाहून केलेली ती कमेंट मला खूपच जिव्हारी लागली होती. तेव्हा सेटवर शंभरहून अधिक व्यक्ती होत्या. अक्षयनं तशी कमेंट करायला नको होते. तो फक्त बोलून थांबला नाही तर बोलल्यानंतर हसतही होता. असेही शांतीप्रियानं सांगितले.

शांतीनं त्या मुलाखतीमध्ये ९० च्या दशकांत बॉलीवूडमध्ये कशाप्रकारे बॉडी शेमिंगचा प्रकार सुरु होता. कित्येक दिग्दर्शक अभिनेत्रींना त्यांच्या दिसण्यावरुन बोलत असतात. त्यांच्या शरीरावरुन टिप्पणी करत. पूर्वी कुणीही भीतीपोटी त्याविषयी बोलत नसायचे. आता मात्र कुणीही ते सहन करत नाही. हा महत्वाचा फरक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khushi Mukherjee: ना ट्रोलिंगची भीती, ना पोलिसांची... प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर जोरदार राडा! पाहा व्हायरल Video

Electric Shock Death : आळेफाटा परिसरात महावितरणचा निष्काळजीपणा! बोरी खुर्द येथे डीपीमुळे विजेचा धक्का लागून ४५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Banking Rules Change : बँकिंगच्या नियमात १ नोव्हेंबरपासून होताय बदल; तुम्हाला माहीत आहेत का?

Kurdu Accident : भाऊबीजेच्या दिवशी काळाचा घाला! बोलाई मातेच्या दर्शनाला निघालेल्या कुर्डू येथील दोन सख्ख्या मित्रांचा अपघातात अंत

Latest Marathi News Live Update : 'मेरा बूथ सबसे मजबूत' कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील कामगारांशी संवाद साधला

SCROLL FOR NEXT