Sharad Kelkar Bollywood actor my wife keerti  esakal
मनोरंजन

Sharad Kelkar : 'माझ्या बायकोला स्क्रिप्ट आवडली तरच...' शरद केळकरनं सरळ सांगून टाकलं!

चोर निकल के भागा या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय सिंग यांनी केले आहे. थ्रिलर या प्रकारातील या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sharad Kelkar bollywood actor my wife keerti : बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेता शरद केळकरनं त्याच्या अभिनयानं मोठी लोकप्रियता मिळवली आहे. त्यानं अजय देवगणच्या तान्हाजी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली तेव्हा तो चाहत्यांच्या चर्चेचा विषय होता. त्याची ती भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. त्यांनी शरदवर कौतूकाचा वर्षाव केला. त्यानंतर तो वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसला.

सध्या शरदची एक प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्याचा प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम सोबत आणि सनी कौशल यांच्या सोबत चोर निकल के भागा नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याच्या प्रमोशनच्या निमित्तानं तो वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देतो आहे. नेटफ्लिक्सवर २४ मार्च रोजी प्रदर्शित होणार असून एका मुलाखतीमध्ये शरदनं दिलेली प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. फ्री प्रेसनं घेतलेल्या त्या मुलाखतीचा भाग चाहत्यांच्या कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे.

Also Read - अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

चोर निकल के भागा या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय सिंग यांनी केले आहे. थ्रिलर या प्रकारातील या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी शरदला त्याच्या चित्रपट निवडीविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. तो चित्रपटाची निवड कशी काय करतो, त्याचे काही वेगळे निकष आहेत का, यावर शरदनं दिलेलं उत्तर नेटकऱ्यांच्या, चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. शरद म्हणाला, माझ्यासाठी चित्रपट कोणत्या माध्यमावर प्रदर्शित होणार आहे याला महत्व नाही तर त्याचा आशय आणि त्यातील माझी भूमिका महत्वाची आहे.

स्क्रिप्टच्याबाबत तू काय विचार करतोस असा प्रश्न विचारल्यानंतर शरदनं दिलेलं उत्तर भन्नाट होतं. तो म्हणाला, मला मार्गदर्शन करण्यात माझ्या पत्नीचा मोठा वाटा आहे. सगळ्यात पहिल्यांदा स्क्रिप्टचे वाचन ती करते आणि मग मला सांगते की तो चित्रपट मी करावा की करु नये. जर तिला ती स्क्रिप्ट आवडली तर मी चित्रपट साईन करतो. अन्यथा नाही म्हणून मोकळा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT