sharad pawar watch satyashodhak marathi movie and demand government
sharad pawar watch satyashodhak marathi movie and demand government SAKAL
मनोरंजन

Satyashodhak Movie Sharad Pawar: सत्यशोधक सिनेमा पाहण्यासाठी सपत्नीक पोहचले शरद पवार, सरकारकडे केली 'ही' मागणी

Devendra Jadhav

Satyashodhak Movie Sharad Pawar News: 'सत्यशोधक' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्यावर आधारित हा सिनेमा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय.

अशातच सत्यशोधक सिनेमा पाहण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार सपत्नीक गेले होते. त्यांनी सिनेमा पाहून कौतुक केलंच शिवाय सरकारकडे खास मागणी केलीय.

शरद पवार यांनी सरकारकडे केली मागणी

महाराष्ट्राचे द्रष्टे नेते मा. शरद पवार यांनी सपत्नीक 'सत्यशोधक' सिनेमा पडद्यावर अनुभवलाय. शरद पवारांना यावेळी सत्यशोधक सिनेमा आवडलेला दिसतोय. यावेळी शरद पवारांना फुले पगडी घालण्यात आली.

शरद पवारांनी सिनेमा पाहिल्यावर सत्यशोधक शालेय विद्यार्थ्यांना दाखवण्यात यावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

मुख्यमंत्री शिंदेंची सत्यशोधक केला टॅक्स फ्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्यशोधक सिनेमा टॅक्स फ्री झाल्याची घोषणा केलीय.CMO एकनाथ शिंदेंनी ट्विटरवर

'सत्यशोधक' मराठी चित्रपटास आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी

असं जाहीर करुन ही घोषणा केलीय. यामुळे सत्यशोधक सिनेमा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. याशिवाय ग्रामीण भागातील अनेक लोकं सत्यशोधक सिनेमा पाहतील

या कलाकारांनी साकारलेल्या भूमिका लोकप्रिय

'सत्यशोधक' चित्रपटात महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप कुलकर्णी यांनी साकारली आहे. तर आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या राजश्री देशपांडे सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत आहेत. तसेच रवींद्र मंकणी, रवी पटवर्धन, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा या दमदार कलाकारांची त्यांना लाभली आहेत.

या चित्रपटाची पटकथा तयार करण्यासाठी राज्य शासनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा संदर्भ घेण्यात आला आहे आणि महात्मा जोतीराव फुलेंचे गाढे अभ्यासक माननीय साहित्यिक प्रा.हरी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT