Sharad Ponkshe Reservation Post Controversy  Esakal
मनोरंजन

Sharad Ponkshe: 'वात गावभर फिरवून आग लावणारा उंदीर...', आरक्षणाचा मुद्द्यामुळे ट्रोल झालेल्या शरद पोंक्षेंची नवीन पोस्ट व्हायरल

Vaishali Patil

Sharad Ponkshe Reservation Post Controversy: गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत आहेत. तसेही ते नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत कमी अन् वादात जास्त असतात. तसचं काहीसं यावेळी झालं आहे. त्यांनी पुन्हा नवीन पोस्ट केली की त्यांमुळे त्यांना टिकेचा सामना करावा लागला.

त्याचे झाले असे की पोंक्षेची मुलगी पायलट झाली. पायलट होत तिने परदेशात नोकरीची संधी मिळवली. निश्चितच एक वडिल म्हणुन शरद पोंक्षे यांच्यासाठी ही खुप अभिमानाची बाब होती. त्यामुळे त्यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर करत लेकीला शुभेच्छा दिल्या. मात्र यावेळी शुभेच्छा देतांना नेहमीप्रमाणे त्यांनी पोस्टमध्ये टोमणे मारले.

त्या पोस्टमध्ये लेकीचं कौतुक करत त्यांनी आरक्षणाचा उल्लेख केला. शरद पोंक्षेंनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला ज्यामुळे त्यांच्यावर चहुबाजुंनी टिका झाली. अनेकांनी त्यांना ट्रोल केलं तर काहींनी पाठिंबा दिला आता यावरुन वादविवाद सुरु असतांनाच शरद पोंक्षे यांनी पुन्हा या सर्व प्रकरणावर भाष्य करणारी एक पोस्ट शेयर केली .

शरद पोंक्षे यांनी फेसबुकला ही पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये ते लिहितात की, 'आपण संध्या देवघरात छान दिवा लावतो, तो फक्त देवासमोर प्रकाश पाडावा, घरात प्रसन्न वाटावं म्हणुन. पण त्याची वात उंदीर घेऊन पळतो व सर्व घराला आग लावतो, तस झालं.आग वातीनं नाही लावली तर ती उंदरानं लावली.

नाही तर वातीचा मंद प्रकाश फक्त देवघरा पुरताच मर्यादित राहिला असता पण उंदरानं ती वात घरभर फिरवून संपूर्ण घराला आग लावली तसं काहीतरी चालू आहे आता दोष मंद तेवणाऱ्या वातीचा? की वात गावभर फिरवून आग लावणाऱ्या उंदराचा?'

कुणाचेही नाव न घेता त्यांनी ही मार्मिक पोस्ट शेयर केली आहे. मात्र नेटकऱ्यांनी त्याचा संबंध त्याच्या जून्या पोस्ट आणि ट्रोलिंग सोबत लावला. आता पुन्हा त्यांची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. नेटकरी पुन्हा त्यांना ट्रोल करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: मनीषा मांढरेच्या लॉकरमध्ये सापडल्या जुन्या प्रश्नपत्रिका; सीबीआयचे अधिकारी पुण्यात तळ ठोकून

Jal Jeevan Mission Takali Rajerai: मनसेच्या आक्रमक भूमिकेला यश; टाकळी राजेरायच्या सकसआहार वस्तीस जलजीवन मिशनमधून पाणीपुरवठा सुरू करण्याची हालचाल

Latest Marathi News Live Update : दिल्लीत २०२६ मधील विजेच्या मागणीचा उच्चांक नोंदवला गेला

KKR vs MI Live: स्वाभिमानासाठी खेळणार? रवी शास्त्रींच्या प्रश्नावर हार्दिक पांड्याचं उत्तर Viral अन् मुंबईने ९ चेंडूंत गमावल्या ३ विकेट्स...

Ashadhi Wari Sant Eknath Palanquin: अधिकमासामुळे संत एकनाथ महाराज पायी दिंडी वारीचे प्रस्थान एक महिना उशिरा; पैठणहून ७ जुलैला पंढरपूरकडे पालखी रवाना

SCROLL FOR NEXT