sharad ponkshe on shraddha walkar murder case sakal
मनोरंजन

Sharad Ponkshe: मुलींनी जरा.. श्रध्दा वालकर हत्ये प्रकरणी शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया

अभिनेते शरद पोंक्षें यांनी मुलींना एक प्रेमाचा सल्ला दिला आहे.

नीलेश अडसूळ

Sharad Ponkshe on shraddha walkar case: सध्या महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची झोप उडवणारं 'श्रद्धा वालकर; हत्या प्रकरण समोर आलं आहे. आफताब पूनावाला या तरुणाकडून फसवणूक आणि मग अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा सर्व स्तरातून निषेध केला जात असतानाच अभिनेते शरद पोंक्षे यांनी मुलींनो जागरूक व्हा.. म्हणत एक पोस्ट शेयर केली आहे.

(sharad ponkshe on shraddha walkar murder case)

मूळची वसईची असलेली श्रद्धा प्रियकर आफताब पूनावालाबरोबर आधी नायगाव येथे राहत होती मात्र नंतर ते दिल्लीमध्ये स्थायिक झाले. दिल्लीला गेल्यावर श्रद्धाने त्याच्यामागे लग्नाचा तगादा लावला. या मुद्द्यावरुन त्यांच्यामध्ये वाद झाला. भांडणादरम्यान आफताबने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करून 18 दिवस फ्रीजमध्ये ठेवले. दरम्यान तो इतर मुलींशी डेट करत होता. पोलिसांनी आफताबला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. अशा गुन्हेगाराला काठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वजण आग्रही आहेत. अगदी सोशल मीडियावरही या प्रकरणावर चर्चा होत आहेत. अनेक कलावंत त्याबाबत व्यक्त होत आहे. आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील पोस्ट शेअर केली आहे.

sharad ponkshe on shraddha walkar murder case

फेसबूकवरील एका यूझरची पोस्ट शेअर करत शरद पोंक्षे यांनी याबद्दल खेद व्यक्त केला आहे. “मुलींनी जागरूक व्हायला हवं” असा एक सल्लाच त्यांनी ही पोस्ट शेअर करताना दिला आहे. 'प्रेमाची व्याख्या बदलत चाललीय.. आई वडिलांनी खूप सांगून सुद्धा न ऐकल्याचा इतका भयंकर परिणाम असू शकतो ही श्रद्धाला कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत कळलं ही नसेल..' अशा आशयाची ही पोस्ट आहे. त्यांच्या या पोस्टवरही कित्येक लोकांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे. काही महिला यूजर्सनी तर जरा नाही जास्तच जागरूक व्हायची गरज आहे असं कॉमेंटमध्ये लिहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT