Sharad Ponkshe shared emotional tweet after vikram gokhale death  sakal
मनोरंजन

Sharad Ponkshe: मी त्याचा एकेरी ऊल्लेख करायचो कारण.. विक्रम काकासाठी शरद पोंक्षेंची पोस्ट..

विक्रम गोखले यांच्याविषयी शरद पोंक्षे यांनी लिहिलेली पोस्ट चुकूनही चुकवू नका..

नीलेश अडसूळ

sharad ponkshe tweet on vikram gokhale: मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे काल शनिवार 26 ऑक्टोबर रोजी निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शोकाकुल झालेले अनेक कलाकार आपल्या भावना व्यक्त करत आहेत. असेच एक ट्विट अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले आहे.

(Sharad Ponkshe shared emotional tweet after vikram gokhale death)

शरद पोंक्षे आणि विक्रम गोखले यांच्यात प्रचंड निकटचे नाते होते. दोघांनीही अनेक मालिका, सिनेमे यांच्यात एकत्र काम केले आहे. शिवाय दोघेही हिंदुत्ववादी विचारधारेचे असल्याने त्यांच्यात एक वेगळाच अनुबंध होता. विक्रम काकांच्या अनेक सामाजिक कामाविषयी शरद पोंक्षे यांनी वारंवार आदर व्यक्त केला आहे. आज एक भलमोठं ट्विट करत त्यांनी विक्रम काका कसे होते, स्वभाव काय होता, त्यांच्यातील नाते कसे होते याविषयी शरद पोंक्षे बोलले आहेत.

शरद पोंक्षे म्हणतात, 'आज अनेक आमच्यासारख्या कलावंतांना पोरकं करुन गेला. त्यांचे काम बघून कॉपी करून अनेक नट तयार झाले. त्या सगळ्यांना पोरकं करून गेला. तूझ्या आत्म्याला शांती लाभूदे . भावपुर्ण श्रध्दांजली विक्रमकाका.

पुढे ते म्हणतात, ''ह्या नाट्य चित्रपट अशा खोट्या जगात जी काही खरी माणसं मला मिळाली त्यातल एक मोठं नाव“ विक्रम गोखले”माझे गुरू विक्रमकाका.जिवंत व सहज अभिनय कसा करावा हे आमच्या सारख्या अनेक पिढ्यांना नकळतपणे शिकवणारा गुरू.पॉज कसा घ्यावा व किती समर्थपणे घ्यावा हे फक्त त्यांनाच जमलं.''

''तरीही न डगमगता ठामपणे आपली भूमिका मांडणारा विक्रमकाका.शेवटच्या क्षणापर्यंत देश,सैनिकांसाठी काम करणारा विक्रमकाका, सतत एकेरी ऊल्लेख करतोय कारण आमचं नातच तस होतं.ते मुलासारखं मानायचे मला.मीही ए काकाच म्हणायचो.असंख्य नाटक सिनेमा मालीकेतून एकत्र कामं केलेयत आम्ही.'' अशा शब्दात शरद पोंक्षे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT