sharad ponkshe shared karnataka deputy cm d k shivakumar photo and slams him for praise tipu sultan  sakal
मनोरंजन

Sharad Ponkshe: टिपू सुलतानच्या थडग्यापुढे वाकणारे हे.. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यावर पोंक्षेंची कडवी टीका

टिपू सुलतान थडग्याचे दर्शन घेतलं म्हणून डी के शिवकुमार आता चर्चेत आले आहेत.

नीलेश अडसूळ

Sharad Ponkshe: अभिनेते शरद पोंक्षे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते असून ते भाजप विचारधारेचे आहे आहेत. त्यामुळे वेळोवेळी त्यांनी कॉँग्रेस पक्ष, राहुल गांधी, यांच्यावर टीका केली आहे. कॉँग्रेस पक्षाच्या प्रत्येक नेत्यावर त्यांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे कॉँग्रेसवर टीका करण्याची ते एकही संधी सोडत नाहीत.

नुकताच कर्नाटक राज्याच्या निकाल समोर आला. कर्नाटक मिळवण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडले. अगदी मोदींपासून ते अनेक बड्या नेत्यांच्या सभा तिथे झाल्या. पण कर्नाटकच्या जनतेने कॉँग्रेसवर विश्वास टाकला आणि तिथे भाजपला चितपट करत कॉँग्रेस बहुमताने विजयी झाले.

त्यानंतर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री पद मिळाले तर डी के शिवकुमार उपमुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शिवकुमार यांनी अशी एक कृती केली की ज्यावर शरद पोंक्षे यांनी सडकून टीका केली आहे.

(sharad ponkshe shared karnataka deputy cm d k shivakumar photo and slams him for praise tipu sultan )

उपमुख्य मंत्री झाल्यानंतर शिवकुमार यांनी टिपू सुलतान यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यावरून आता पोंक्षे यांनी कॉँग्रेसला लक्ष केले आहे. शिवकुमार यांचा एक फोटो त्यांनी शेयर केला आहे. ज्यामध्ये शिवकुमार टिपू सुलतान यांच्या थडग्याचे दर्शन घेताना दिसत आहेत.

सोबत त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये पोंक्षे म्हणतात, ''हे आहेत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार शपथ ग्रहणाच्या अगोदर जाऊन टिपू सुलतान च्या थडग्यावर दर्शन घेऊन त्याचा आशीर्वाद घेऊन आले आणि नंतर उपमुख्यमंत्री झाले.... कोंग्रेस पार्टी उघडपणे इतकं सगळं करत असताना देखील जेव्हा हिंदू लोक यांना मत देतात ह्यापेक्षा दूर्दैव काय असू शकत?'' अशा शब्दात पोंक्षे यांनी टीका केली आहे.

अभिनेते शरद पोंक्षे यांची वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतं यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. अभिनया सोबतच हिंदुत्व आणि सावरकर या विषयावर राज्यभरात व्याख्यान देत असतात. त्यामुळे ते कट्टर हिंदुत्ववादी आणि सावरकरप्रेमी आहेत.

किंबहुना सावरकर आणि शरद पोंक्षे हे एक समीकरणच आहे. पोंक्षे आपल्या भाषणाने कायमच सर्वांना प्रभावित करत असतात. सध्या त्यांची सावरकर विचार यात्रा अगदी जोरदार सुरू आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यात, गांव खेड्यात जावून ते व्याख्यान देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ! चार दिवसाच्या विश्रांतीनंतर घरी परतणार

Latest Marathi News Live Update : नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी १४ कोटींचा विकास आराखडा

आई झाल्यावर पहिल्यांदाच दिसली कतरिना, चाहत्यांना बघत क्यूट स्माइल देत केलं असं काही की... VIRAL VIDEO

Stock Market Today : शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; IT शेअर्समध्ये वाढ; कोणते शेअर्स तेजीत?

Donald Trump : कोट्यवधी लोकांचा बळी गेला असता, भारत-पाक अणुयुद्ध मी थांबवले; ट्रम्प यांचा पुनरूच्चार

SCROLL FOR NEXT