Sharad Ponkshe shared post about Hindus are becoming unite this is going to be happy sakal
मनोरंजन

Sharad Ponkshe: हिंदू एक होतायत.. हेच सुखावणारं आहे! शरद पोंक्षे यांच्या पोस्टनं चर्चेला उधाण..

शरद पोंक्षे यांच्या विधानाने साऱ्यांचेच लक्ष वेधले..

नीलेश अडसूळ

sharad ponkshe: अभिनेते शरद पोंक्षे म्हणजे कडाडती तोफ. उत्तम अभिनय आणि तितकीच शब्दावर आणि भाषेवर पकड. त्यांचे भाषण ऐकणे म्हणजे पर्वणीच असते. आपल्या हिंदुत्ववादी विचारांनी ते प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना भारावून टाकतात.

अभिनेते शरद पोंक्षे हे सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या कामामुळे.. कधी व्याख्याना,मुळे तर कधी सोशल मिडियावरील पोस्ट मुळे.. त्यांची वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतं यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. ते स्वतः समाज माध्यमांवर सक्रिय असतात.

(Sharad Ponkshe shared post about Hindus are becoming unite this is going to be happy)

इतकच नाही तर ते अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर निर्भीडपणे भाष्यही करत असतात. पोंक्षे यांचे विचार, हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच माहीत आहे.

शरद पोंक्षे अभिनयासोबतच राष्ट्रप्रेमावर व्याख्यान देत असतात. हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयांवर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. सध्या ते पुणे जिल्ह्यात व्याख्यान देत आहेत. याच व्याख्याना दरम्यान त्यांनी एक पोस्ट शेयर केली आहे.

नुकतीच रामनवमी झाली. यानिमित्ताने शरद पोंक्षे पुणे जिल्ह्यात व्याख्यान द्यायला गेले होते. मोशी, चिखली या भागात त्यांचा दौरा होता. यावेळी प्रचंड गर्दी जमली होती. मोठ्या संख्येने लोक पोंक्षे यांना ऐकण्यासाठी आले होते.

या व्याख्यानातील काही फोटो शेयर करत पोंक्षे म्हणतात, ''आता मोशी,चिखली ,पुणे येथे व्याख्यान झालं. हिंदू एक होतायत. हेच सुखावणार आहे.'' सोबत त्यांनी गर्दीचे फोटो ही जोडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT