Sharad Ponkshe shared video on nathuram godse jayanti birth anniversary sakal
मनोरंजन

Sharad Ponkshe: नथुरामचा कबुली जबाब का जाळला गेला? आज जयंती निमित्ताने पोंक्षेंची संतप्त पोस्ट..

नथुराम गोडसेच्या जयंती निमित्त शरद पोंक्षे यांनी विचारला सवाल..

नीलेश अडसूळ

Sharad Ponkshe : ''गांधी आणि गोडसे'' हा कायमच भारतात वादाचा मुद्दा राहिलेला आहे. नथुराम गोडसेने गांधींवर गोळ्या झाडून त्यांचा खून केला. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु आजही हिंदुत्ववादी संघटनांकडून गांधींचा तिरस्कार केला जातो, तर नथुराम गोडसेचा जयजयकार केला होता.

अभिनेते शरद पोंक्षे याच हिंदुत्ववादी विचारधारेचे असल्याने ते कायमच नथुराम गोडसेच्या बाजूने भाष्य करतात. त्यांचे 'हे राम.. नथुराम' हे नाटक त्याचाच हे भाग होते. यामध्ये गांधी नथुरामच्या कृत्याचा पुरस्कार केला गेला होता. त्यामुळे हे नाटक बरेच वादात सापडले होते.

आज नथुराम गोडसे यांची जयंती.. या निमित्ताने अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी नथुरामचा कबुली जबाब का जाळला असा संतप्त प्रश्न विचारला आहे.

(Sharad Ponkshe shared video on nathuram godse jayanti birth anniversary)

आज नथुराम गोडसेचे जयंती. याच निमित्ताने शरद पोंक्षे यांनी एक विडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओ मध्ये ''नथुरामचा कबुली जबाब का जाळला गेला?'' असा संतप्त सवाल केला आहे. सोबतच या व्हिडिओ मध्ये ते म्हणतात, ''नथुराम गोडसेने जेव्हा पहिल्या दिवशी त्यांची जबानी दिली आणि जज तिथून निघून गेले. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले पत्रकार जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांच्यावर पोलिसांनी हल्ला केला, त्यांना घेराव घातला.''

पुढे पोंक्षे म्हणतात, ''त्यांच्या जवळ असलेले सगळे दस्तऐवज, नथुरामचा जबाब हिसकावून घेण्यात आला. एवढेच नाही त्यांना दमदाटी करून ते जाबनीचे सगळे कागद जाळण्यात आले. एवढेच नाही तर सर्व पत्रकारांना धमकावण्यात आले की, एक जरी शब्द नथुराम विषयी लिहाल तर तुमची काही खैर नाही. त्यानंतर नथुराम विषयी कधीही कोणत्या पेपरात छापुन आले नाही.'' अशी संतप्त पोस्ट किरण माने यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Tree Fall Incident : पुण्यातील विमाननगरमध्ये चालत्या गाडीवर कोसळलं गुलमोहराचं झाड; सुदैवाने जीवितहानी टळली, पण वाहतूक कोंडीचा नागरिकांना फटका

IPL 2026: तीन बॅट, तिनदा रिजेक्ट अन् मग अंपायरलाच कळाली चूक; आयुष म्हात्रेच्या बॅटवरून मैदानात गोंधळ, नेमकं काय घडलं

Latest Marathi News Live Update : दिंडोरीतील अपघातग्रस्त विहीर बुजविण्याचे काम सुरू

नागपूरमध्ये ४५ बार बंद, परवाना शुल्कात वाढ झाल्याने मालकांवर आर्थिक ताण

Numerology : प्रचंड हुशार असतात 'या' 3 मूलांकाचे लोक; पण व्यसन नाही, तर 'या' वाईट सवयीमुळे जीवनात यश मिळायला लागतो खूप उशिर

SCROLL FOR NEXT