Sharad Ponkshe talk about newton and dnyaneshwar mauli viral video sakal
मनोरंजन

Sharad Ponkshe: न्यूटन मोठाच पण ज्ञानेश्वर माऊली त्याहून.. शरद पोंक्षेंचा हा व्हिडीओ बघाच..

अभिनेते शरद पोंक्षे यांनी 'राष्ट्रभक्ती'वर दिलेल्या व्याख्यानातील हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

नीलेश अडसूळ

sharad ponkshe: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे समाज माध्यमांवर सक्रिय असतात. इतकच नाही तर ते अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर खूल्यापणे भाष्यही करत असतात. पोंक्षे यांचे विचार, हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच चांगलिच माहीत आहे. शरद पोंक्षे राष्ट्रप्रेमावर व्याख्यान देत असतात. त्यांच्या एका व्याख्यानातला व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी न्यूटन आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्यावर महत्वाचे भाष्य केले आहे.

(Sharad Ponkshe talk about newton and dnyaneshwar mauli viral video)

या व्हिडिओमध्ये शरद पोंक्षे म्हणाले आहेत, 'आम्हाला न्यूटन मोठा वाटतो. न्यूटन मोठाच आहे. पण त्याने खाली काय येतं याचा शोध लावला. त्याच्या आधी १२व्या शतकामध्ये १६ वर्षांचं मुल सांगून गेलं खालून वर जाण्याची किमाया.. त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर.'

पुढे ते म्हणाले, 'ते फळ वरून खाली येतं पण ते वरपर्यंत जातं कसं? जमिनीमध्ये बी पेरलं जातं. बी पेरल्यानंतर ते बी फुटतं. बी फुटल्यानंतर संपूर्ण कायनात, निसर्ग, पंचमहाभूतं त्याला वाढवण्याची जबाबदारी घेतात. खाली येण्याच्या विरुद्ध दिशेनं ते झाड वाढतं. जमिनीमधून बाहेर येतं. मग ते रोपटं वर वर जातं. कुठे गेला मग तो फळ खाली येण्याचा नियम?”

'रोपटं वर वर जातं. आकाशाकडे झेपावतं. त्याचा मोठा वृक्ष तयार होतो. मग त्याला फुल, फळं लागतात. मग ते फळ पिकतं व खाली पडतं. त्यानंतर तो न्यूटन येतो. पण आधी आले ते ज्ञानेश्वर. हे सांगितल्यावर चेहऱ्यावर जे भाव येतात, त्याने उर भरून येतो, ज्ञानेश्वर वाचावे.. असं वाटतं. त्यालाच म्हणतात अस्मिता.' शरद पोंक्षे यांचा हा व्हिडीओ सध्या अनेकांना प्रेरणा देऊन जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

“वयाचं गणित फेल!” – सुबोध-रिंकूच्या जोडीनं सोशल मीडियावर रंगली ट्रोलिंग, रिंकू- सुबोधच्या वयात नक्की किती अंतर आहे?

Latest Marathi News Live Updates : निम्न दूधनाचा पाणीसाठा ७० टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT