Sharayu Sonawane Engagement: स्टार प्रवाहवरील पिंकीचा विजय असो ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. याच मालिकेत पिंकीची भुमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे हिने गुपचुप साखरपुडा करत सर्वांना सुखद धक्का दिलाय.
शरयूने साखरपुड्याचा रोमॅंटीक फोटो शेअर करत तिच्या सर्व फॅन्सना आश्चर्यचकीत केलंय. शरयूच्या साखरपुड्याची बातमी कळताच सर्वांनी कमेंट करुन तिचं अभिनंदन केलंय.
(sharayu sonawane engagement with jayant lade actress from pinkicha vijay aso on ganesh chaturthi)
शरयूचा होणारा नवरा नक्की आहे कोण?
शरयू सोनावणेने गुपचुप साखरपूडा केलाय. तिचा होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे जयंत लाडे. शरयूने जयंतसोबत साखरपूड्याचा रोमँटीक फोटो शेअर करुन कॅप्शन लिहीलंय की,
"आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे. Happy and engaged...!” गणपती बाप्पा मोरया" अशा शब्दात शरयूने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शरयूचा होणारा नवरा जयंत लाडे हा एक फिल्ममेकर आणि निर्माता आहे. शरयूने साखरपुड्याचे फोटो पोस्ट करताच मराठी सेलिब्रिटी आणि फॅन्सनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय.
शरयूने सोडली पिंकीचा विजय असो मालिका
शरयूने काही दिवसांपूर्वी पिंकीचा विजय असो मालिकेला रामराम ठोकला. या मालिकेत शरयू प्रमुख भुमिका साकारत होती. शरयूने रंगवलेली पिंकीची भुमिका सर्वांच्या पसंतीस उतरली.
परंतु काही दिवसांपूर्वी शरयूने पिंकीचा विजय असो मालिका सोडत सर्वांना धक्का दिला. शरयूला या मालिकेमुळे अमाप लोकप्रियता मिळाली. सध्या अभिनेत्री आरती मोरे मालिकेत पिंकीची भुमिका साकारत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.