Shark Tank 2 Esakal
मनोरंजन

Shark Tank 2 मध्येही बिग बॉस! अनुपम मित्तलसोबत भांडण झाल्यानंतर 'या' शार्कने शो मध्येच सोडला..

Vaishali Patil

टिव्हीवरील शार्क टँक इंडियाच्या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांकडून भरभरून पसंती मिळवत आहे. भारतातील पहिल्याच बिझनेस रिअॅलिटी शोमध्ये वैद्यकीय, तंत्रज्ञान क्षेत्रापासून ते सौंदर्यप्रसाधनांपर्यंत अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांच्या पिचेसमुळे हा सीझन खूप लोकप्रिय होत आहे. या सीझनला खूप लोकप्रियता मिळाली आहे आणि हा शो सध्या खूप चर्चेत आहे.

दरम्यान, शोचा एक व्हिडिओ शार्क टँक 2 प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये दोन शार्क म्हणजेच नमिता थापर आणि अनुपम मित्तल यांच्यात वाद होतांना दिसतोय.

हेही वाचा: सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

झालं असं की, नेस्टरूट्स नावाचा ब्रँड असलेल्या एका महिला व्यावसायिकाने सगळ्यांना प्रभावित केलं. नेस्टरूट्स हा भारतीय ब्रँड असून आतापर्यंत एक लाख घरांमध्ये तो पोहोचला असल्याची माहितीही त्या महिलेनं दिली. “आम्ही किचन, डायनिंग, डेकॉर आणि फर्निशिंगबाबत नवे पर्याय सुचवतो,” असंही तिनं सांगितलं.

ही माहिती ऐकल्यावर विनिता प्रभावित झाली होती; मात्र या ब्रँडला आत्तापर्यंत काही नफा झालाय का असा प्रश्न पीयूषने विचारला. यावर कंपनीचा नफा 16-19 टक्के असल्याचं त्या महिला व्यावसायिकाने सांगितलं.

दरम्यान शार्क नमिता (शुगर कॉस्मेटिक्स सीईओ) ने त्वरीत 4 टक्के इक्विटीसाठी 65 लाख रुपये देऊ केले. यामुळे अमन संतापला आणि म्हणाला, "कभी तो किसी को ले लिया करो यार." अनुपमही मागे न हटता म्हणातो, "तुम्ही मूल्य वाढवू नका, तुम्ही फक्त हिरोगीरी करा." यावर अमनने उत्तर दिले की, "हिरो हिरोच राहणार आणि खलनायक खलनायकच राहणार".

याच्या पुढे अनुपम म्हणाला, "तुम्हाला काय वाटते याने काही फरक पडत नाही." यावर नमिताने "हे ठीक नाही, तुला तुझा इगो नियंत्रणात ठेवायला हवा हे वागणं योग्य नाही" असं म्हणत शो सोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Price Today: दिवाळीपूर्वी चांदीने 2 लाखांचा टप्पा ओलांडला; एकाच दिवसात 10,000 रुपयांची वाढ

Maratha Reservation : 'कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय कोणतीही सरकारी नोकरभरती करू नका'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Mumbai : ठाकरे बंधूंसह मविआचे नेते पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेणार, पण शरद पवार अनुपस्थित

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा 21वा हप्ता 'या' दिवशी येऊ शकतो

High Court: राज्य सरकारला दणका, 'तो' निर्णय हायकोर्टानं केला रद्द

SCROLL FOR NEXT