Namita Thapar Shark Tank  esakal
मनोरंजन

Namita Thapar : 'मिशीवाली पोरगी, जाडी कुठली!' शार्क टँकच्या नमिताचा 'बॉडी शेमिंग'चा धक्कादायक अनुभव

शार्क टँकमध्ये आपल्या बिनधास्त, परखड वक्तव्यामुळे नमिता ही नेहमीच चर्चेत असते. ती एक प्रसिद्ध उद्योगपतीही आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shark Tank 2 Namita Thapar Share body Shaming experience : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये आपल्या वेगळेपणानं प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवणारा शो म्हणून शार्क टँकचे नाव घ्यावे लागेल. या शोमधील वेगवेगळे परिक्षक हे चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतात. त्यापैकी एक म्हणजे नमिता थापर. तिनं तिच्याबाबत घडलेला बॉडी शेमिंगचा अनुभव सांगितला आहे.

शार्क टँकमध्ये आपल्या बिनधास्त, परखड वक्तव्यामुळे नमिता ही नेहमीच चर्चेत असते. ती एक प्रसिद्ध उद्योगपतीही आहे. एमक्योर या कंपनीची ती सीइओ आहे. शार्क टँकमध्ये ती उद्योजकांना ज्यापद्धतीनं प्रश्न विचारते, त्यांना डील करते हे तिच्या चाहत्यांना आवडते. त्यावरुन नमिता ही सोशल मीडियावर लोकप्रिय झाली आहे.

Also Read - मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

नमितानं सांगितलं की, ती तिच्यासाठी वाढत्या आकाराची कपडे घेत असे. तेव्हा तिची तब्येत ही जास्त होती. त्यामुळे तिला अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. ती म्हणाली मला माझ्या प्रकृतीवरुन अनेकांचे टोमणे खावे लागले. मी ते सहन केले. गेल्या काही दिवसांपासून शार्क टँकचा दुसरा सीझन हा कमालीचा लोकप्रिय होताना दिसत आहे.

मला लहानपणी नेहमीच जाडी, जाडी असं म्हणून चिडवण्यात आलं. त्याचं झालं असं की, शार्क टँकमध्ये एका उद्योजिकेनं आपल्या कपड्यांच्या ब्रँडविषयी सांगितले. तेव्हा नमितानं तिला तुम्ही मोठ्या व्यक्तीसाठी कपडे डिझाईन करण्याचा विचार का केला नाही. असा प्रश्न विचारला होता. तेव्हा नमितानं तिला तिच्या बॉडी शेमिंगविषयी सांगितले.

खरंतर नमितानं ती गोष्ट चेतन भगतच्या पॉडकास्टमध्ये सांगितली होती. माझे वाढते वजन, फेशियस हेअर यामुळे मी खूप वैतागले होते. मला खूप जण चिडवायचे. पण मी हे सगळे सहन केले. असे नमितानं सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT