Shark Tank India 2 Namita Thapar Prapose to Anupam Mittal viral social  esakal
मनोरंजन

Shark Tank India 2 : 'तुम्ही मला आवडलात, लग्न करायचं का?' शार्क टँकच्या नमिताचं अनुपमला प्रपोझ, पण...

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये शार्क टँक हा रियॅलिटी शो चांगलाच लोकप्रिय झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळताना दिसतो आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shark Tank India 2 : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये शार्क टँक हा रियॅलिटी शो चांगलाच लोकप्रिय झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळताना दिसतो आहे. गेल्या काही दिवसांपासून शार्क टँकचा दुसरा सीझन प्रेक्षकांसमोर आला आहे. त्यातील एक व्हिडिओ आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

शार्क टँकचे जज नमिता थापर, अनुपम मित्तल हे त्यांच्या हटकेपणासाठी ओळखले जातात. मात्र झालं असं की, नमिता यांनी अनुपम मित्तल यांना जे म्हटलं त्यावरुन त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. नेटकऱ्यांना नमिता यांचा तो अंदाज काही आवडलेला नाही. त्यांनी नमिताची चांगलीच शाळा घेतली आहे.

Also Read - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

नमिता यांनी गंमतीत का होईना अनुपम मित्तल यांना प्रपोझ केलं. त्यामुळे नेटकरी संतापले आहे. त्या म्हणाल्या, तुम्ही मला आवडलात, आता आपण लग्नाची तारीख फिक्स करुया का....नमिता असं म्हणतातच सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. नेटकऱ्यांनी नमिताजी आपण असं म्हणालात हे आम्हाला काही आवडलं नाही. अशा शब्दांत टीका केली आहे.

नमिता यांनी अनुपम मित्तल यांना आपल्या लग्नाची तारीख पक्की करण्यास सांगितलं आहे. नेटकऱ्यांना हा प्रकार काही आवडलेला नाही. नेटकऱ्यांनी शार्क टँकला ट्रोल केलं आहे. बिझनेस रियँलिटी शो मध्ये शार्क टँकची चर्चा आहे. बिझनेस डील्स करणाऱ्यांसाठी या शो ची लोकप्रियता मोठा आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही प्रचंड असल्याचे दिसून आले आहे.

एका उद्योजकानं त्यांच्या सॉफ्ट ड्रिंकचं प्रमोशन सुरु केलं. त्याच्याविषयी माहिती द्यायला तो लागला. तेव्हा अनुपमनं त्याच्या सॉफ्ट ड्रिंकसाठी बाकीच्या जजेसला मनवलं. त्यावेळी नमिता यांनी अनुपमला त्या गोष्टीविषयी सांगितलं. मात्र ती गोष्ट नेटकऱ्यांना काही आवडलं नाही. त्यांनी नमिता ट्रोल करण्यास सुरुवात केलं. नमितानं गंमतीमध्ये आपल्या लग्नाची तारीख ठरवायची का असं म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs Shivsena: २०२९ तयारी? भाजपमधील इनकमींगची दूसरी बाजू काय? शिंदे गटाच्या नेत्यांविरुद्ध ‘स्ट्राँग प्लॅन-B’ तयार?

Mundhwa Land Scam : शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीला समन्स; खारगे समितीपुढे सुनावणी, व्यवहाराची इत्थंभुत माहिती घेणार

Rising Star Asia Cup 2025 : भारत 'अ' संघाचा ओमान 'अ' संघावर ६ गडी राखून दणदणीत विजय, सेमिफानलचं तिकीट केलं पक्क...

Latest Marathi Breaking News Live Update : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा संताप उसळला: मदत वाटपातील विषमतेविरोधात वैजापूरमध्ये उपोषण

Ajit Pawar : मिळकतकराचा तिढा दोन दिवसांत सुटणार; समाविष्ट गावांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे अजित पवार यांचे आदेश

SCROLL FOR NEXT