Sharmila Shinde esakal
मनोरंजन

VIDEO: "मी गेली कित्येक वर्ष मुंबईत एकटी राहतीये"; माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्रीनं सांगितला किस्सा

Sharmila Shinde: नुकताच शर्मिलानं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शर्मिलानं चाहत्यांना एक किस्सा सांगितला आहे.

priyanka kulkarni

Sharmila Shinde: छोट्या पडद्यावरील माझ्या नवऱ्याची बायको (Majhya Navaryachi Bayko) या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेच्या कथानकाचं आणि या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. या मालिकेत जेनी या भूमिकेला देखील प्रेक्षकांची प्रेक्षकांची पसंती मिळाली. ही भूमिका अभिनेत्री शर्मिला शिंदेनं साकारली आहे. नुकताच शर्मिलानं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शर्मिलानं एक किस्सा सांगितला आहे.

शर्मिलानं सांगितला किस्सा

शर्मिला शिंदेनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शर्मिला म्हणते, "मी गेली कित्येक वर्ष मुंबईत एकटी राहतीये. माझ्याकडे इतक्या वर्षात घर कामाला कोणी बाई नव्हती किंवा गडी नव्हता. कारण माझ्या येण्या-जाण्याची वेळ फिक्स नसायची. त्यामुळे मी स्वत:ला एक सवय लावून घेतली होती की, 24 तासात जेव्हा-केव्हा मला वेळ मिळेल. त्यावेळेत मोबाईलवर एक तासाचा टायमर लावायचा आणि त्या एक तासात एक खोली साफ करायची. असं मी गेली कित्येक वर्ष सातत्यानं करत आहे. पण गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात माझ्या लक्षात आलं की, वेळ नसल्यामुळे हे आता करता येणार नाही. त्यामुळे मी एका मावशींना रिक्वेस्ट केली की, माझ्यावेळेनुसार तुम्ही माझ्या घरी काम कराल का? आता मला छान ताई मिळाल्या. त्या माझ्याकडे काम करायला लागल्या."

पुढे शर्मिला म्हणते, "काल त्या ताई मला म्हणाल्या की, ताई तुमच्या व्हॅट्स अॅपचा डीपी बघून मला माझी मुलगी म्हणाली की, तुझ्या ताई माझ्या नवऱ्याची बायकोमधल्या जेनी सारख्या दिसतात. मी म्हटलं ती मीच आहे. आधी त्यांचा विश्वास बसला नाही, मग नंतर त्यांचा विश्वास बसला, त्या खूप हसल्या. आज अचानक माझं घर खूप स्वच्छ झालंय. मी मावशींना मागच्याच वर्षी सांगायला पाहिजे होतं की, मीच जेनी आहे."

पाहा व्हिडीओ:

शर्मिला शिंदेनं शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT