Sharvari Wagh Instagram
मनोरंजन

Urfi Javed सारखेच कपडे घालून आली शर्वरी वाघ..आता काय करतील चित्रा ताई?

'एले ग्रॅज्युएट फॅशन शो' मध्ये अगदी हुबेहूब उर्फी जावेदसारखे कपडे शर्वरी वाघने घातल्याने आता नेटकरी तिला 'उर्फी पार्ट २' म्हणत ट्रोल करत आहेत.

प्रणाली मोरे

Urfi Javed: सध्य़ा उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात तुंबळ युद्ध सुरु आहे. सोशल मीडियावर सुरु झालेला हा वाद थेट आता महिला आयोग आणि पोलिस स्टेशन पर्यंत पोहोचला आहे.

उर्फीच्या अतरंगी कपड्यांवर आक्षेप घेत सुरवातीला चित्रा वाघ यांनी तिला हा नंगा नाच थांबव नाहीतर...अशी इशारावजा धमकी दिली होती.

पण ऐकेल ती उर्फी कसली,तिनं देखील चित्रा वाघ यांच्या धमकीचं चॅलेंज स्विकारत थेट महिला आयोगाकडे धाव घेतली. अन् पोलिस स्टेशनही गाठलं. (Sharvari Wagh at Elle Graduates Fashion Show, copy urfi javed netizens react)

सोशल मीडियावर सध्या उर्फी जावेद सर्वात चर्चेतलं नाव. तिचे अतरंगी कपडे पाहिले की हसावं की रडावं ही अवस्था सर्वसामान्यांची असते. आता नेटकरी तिला यावरनं ट्रोल करतात आणि विषय सोडून देतात. पण हळूहळू उर्फीच्या विषयाला राजकारणाचा रंग चढला जेव्हा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर तोंडसुख घेतलं. अनेकदा उर्फी अतिशय बोल्ड कपडे घालून पब्लिकच्या गर्दीत फोटो पोझ देताना दिसते यावर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे.

हेही वाचा: आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

आता अगदी उर्फीसारखेच कपडे घालून बॉलीवूडची सध्याची चर्चेत असलेली अभिनेत्री शर्वरी वाघ दिसली अन् पुन्हा चर्चेला उधाण आलं. एले ग्रॅज्युएशन फॅशन शो मध्ये शर्वरी वाघनं अगदी हुबेहूब उर्फीसारखा ड्रेस घातला होता. जो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली आहे.

भगव्या रंगाच्या मोनोकनीवर रोपचा स्कर्ट आणि ब्लेझर घालून शर्वरी वाघ दिसली अन् लोकांनी तिला उर्फी पार्ट २ म्हणून ट्रोल करायला सुरुवात केली. आता उर्फी असे विचित्र कपडे घालते म्हणून तिला चित्रा वाघ यांनी धारेवर धरलंय पण आता तसेच कपडे शर्वरी वाघने घातले आहेत..तर आता काय करतील चित्रा वाघ? असा सवालही निर्माण केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT