shashank ketkar shared instagram story about misinterpretation of holi post and he oppose to celebrate all marathi festivals in hindi style  sakal
मनोरंजन

Shashank Ketkar: सगळे सण साजरे करण्याच्या पद्धती.. 'हिंदी'च्या अनुकरणावर शशांक केतकर भडकला..

शशांक केतकरने मराठी सण हिंदी पद्धतीने साजरे केले जात असल्याने पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे.

नीलेश अडसूळ

shashank ketkar: होणार सून मी ह्या घरची', 'हे मन बावरे', 'पाहिले न मी तुला' यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar)अभिनयसोबतच सामाजिक, राजकीय विषयावर देखील भाष्य करत असतो.

यावरून अनेकदा त्याला ट्रॉल देखील केले आहे. परंतु त्याने कायमच आपली भूमिका हि परखडपणे मांडली आहे. आता त्याने पुन्हा एकदा मोठ्या मुद्द्याला हात घातला आहे. तो म्हणजे मराठी भाषा.

भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला शशांकने एक पोस्ट शेयर करून होळी, रंगपंचमी आणि धूलिवंदन यातला फरक सांगितला होता, सोबतच मराठी सणांचे आणि भाषेचे महत्व पटवून दिले होते. पण या पोस्ट मधून अनेकांनी गैरसमज करून घेतल्याने शशांकने पुन्हा एक स्टोरी शेयर केली आहे.

(shashank ketkar shared instagram story about misinterpretation of holi post and he oppose to celebrate all marathi festivals in hindi style )

शशांक म्हणतो, 'बरं, कालच्या माझ्या पोस्ट नंतर काही जणांच हे cinfusion झालं आहे की मी.. भाषा, उच्चार या वरुन बोलतो आहे. (हे मोठ्याने वाचा) (ठळक).. नाही हो..

मुद्दा वेगळा होता.. प्रजासत्ताक दिनाला आपण स्वातंत्र्य दिन म्हणू का? राखी पौर्णिमेला भाऊबीज म्हणून का? तुमचं नाव सुरेश असेल तर रमेश आशा हाकेला ओ द्याल का?

मराठी संभाषणात इतर भाषेतले शब्द वापरायचे नाहीत वगैरे इतका बालिश तर मी मुळीच नाही.. त्यामुळे माझा हाही मुद्दा नव्हता.. '

सगळे सण साजरे करण्याच्या पद्धती हिंदी स्टाइल झाल्या आहेत किंवा सगळ्याचा बिजनेस झाला आहे. मुद्दा हा होता..

मी फक्त एक माध्यम आहे.सेवक आहे. नोकर आहे. जे माझ्या समोर लिहून येईल ते पोटतिडकीने सादर करणे हे माझे काम आहे. पण प्रोटेस्ट सुद्धा करणे हे मला पटत नाही.. असो.. शुभेच्छा सगळ्यांना.. '' त्याची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे.

shashank ketkar shared instagram story about misinterpretation of holi post and he oppose to celebrate all marathi festivals in hindi style

झाले काय होते ?

शशांकने एका दिनदर्शिकेचा फोटो शेयर केला होता. ज्यामध्ये काही मराठी सण अधोरेखित केले होते. लवकरच होळीचा सण येणार आहे. आपण होळीलाही होळीच म्हणतो आणि हिन्दी मुळे धूलिवंदनलाही होळीच म्हणतो. काहीजण धूलिवंदनला रंगपंचमी म्हणतात. पण मराठी भाषा आणि परंपरेनुसार हे तीनही सण वेगळे आहेत. याचे भान शशांकने करून दिले होते. पण नेटकऱ्यांनी मात्र वेगळाच समज करून घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Miss Universe 2025 : ज्युरीचं स्पर्धक मॉडेलशी अफेअर, जजने फायनलच्या ३ दिवस आधी दिला राजीनामा; सगळं आधीच ठरल्याचा आरोप

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

RTO Scam:'आरटीओच्या जाहिरातीतून फसवणुकीचा नवा फंडा; १९९९ रुपयात वाहन न चालवताच परवाना देण्याचे अमिष, काय आहे वास्तव..

Latest Marathi Breaking News Live Update : "कल्याण-डोंबिवलीत महापौर भाजपचाच"- नरेंद्र पवार

SCROLL FOR NEXT