Shatrughan Sinha On The Kerala Story Esakal
मनोरंजन

The Kerala Story: निवडणुकीच्या तोंडावरच धर्मांतरावर चित्रपट का? शत्रुघ्न सिन्हांचा सवाल

Vaishali Patil

Shatrughan Sinha On The Kerala Story: अदा शर्माची मुख्य भुमिका असलेला 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट हा सध्या मनोरंजन विश्वात धुमाकूळ घालत आहे. 5 मे ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला रिलिज होऊन आता सहा दिवस झाले आहे. या सहा दिवसात या बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे.

या चित्रपटाबाबत प्रेक्षक आणि राजकिय नेत्यांमध्येदेखील दोन वेगळे दृष्टीकोन पाहयला मिळत आहे. काहींना हा चित्रपट खुप आवडला आहे तर काहींनी याला प्रोपगंडा म्हणत त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

त्यातच आता अनेक राजकिय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चित्रपटाचं कौतुक करत काँग्रेसवर निशाणा साधला. तर ममता बॅनर्जी यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. त्यातच आता बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगतिलं की, मी केरळ स्टोरी पाहिली नाही. पण जर एखाद्या चित्रपटामुळे राज्याच्या शांततेला धोका निर्माण होत असेल, तर त्यावर बंदी घालण्यात यावी. हे गरजेच आहे. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, प्रत्येक माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये.

याचवेळी पश्चिम बंगालमध्ये 'द केरळ स्टोरी'च्या रिलीजवर घालण्यात आलेल्या बंदीचं त्यांनी कौतुक केलं आहे. ते म्हणाले की, ममता बॅनर्जी या दूरदृष्टीच्या नेत्या आहेत. हा चित्रपट कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करू शकतो, असं त्यांना वाटत असेल, तर त्यासाठी त्यांच्याकडे कारण असावं.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचंही त्या नेहमीच समर्थन करतात. जर त्यांना वाटत असेल की हा चित्रपट एखाद्या विशिष्ट वर्गासाठी धोकादायक आहे, तर त्यांना योग्य वाटेल ते करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे.

तर या चित्रपटाला प्रोपगंडा हा चित्रपट म्हणत असल्याबाबतही त्यांनी भाष्य केलं. शत्रुघ्न सिन्हा 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाविषयी म्हणाले, 'माझ्यासाठी मी नेहमीच स्वातंत्र्याच्या हक्कासाठी उभा राहिलो आहे.

विवेक अग्निहोत्रीच्या द काश्मीर फाइल्सच्या खूप आधी मी काश्मिरी पंडितांच्या दुर्दशेबद्दल बोललो होतो. तेव्हा सरकारने लक्ष दिलं नाही. विवेकच्या चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांवर वाद निर्माण झाला असेल तर मला आनंद आहे.

संवेदनशील विषयांवर चित्रपट बनले पाहिजेत. पण ते संवेदनशीलपणे केले पाहिजे. निवडणुकीच्या वेळी धर्मांतराचा हा चित्रपट का? वेळ जरा संशयास्पद वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी बिजबेहरा येथील जाबलीपुरा फळ बाजारात फळ उत्पादकांच्या आंदोलनात सहभाग घेतला

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT