Shatrughan Sinha Interview esakal
मनोरंजन

Shatrughan Sinha : 'कित्येक मोठे हिरो माझ्यावर जळायचे म्हणून तर मला कधीही...', शत्रुघ्न सिन्हा काय बोलून गेले?

त्या मुलाखतीमध्ये शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी बऱ्याच गोष्टींना उजाळा दिला आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Shatrughan Sinha latest news : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहेत. यापूर्वी देखील त्यांनी त्यांच्या विविध वक्तव्यांनी वेगळे वातावरण निर्माण केले होते. प्रतिभावान अभिनेता ते (Shatrughan Sinha Reaction On Bollywood Old Hero) मुत्सदी राजकारणी अशी त्यांचा प्रवास हा नेहमीच प्रेरणादायी राहिला आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी काही मुलाखतींमध्ये आपल्या या लाडक्या (Amitabh Bachchan Latest news) मित्राविषयीच्या आठवणी सांगितल्या होत्या. शत्रुघ्न सिन्हा त्यांचा स्वभाव, त्यांची काम करण्याची पद्धत यामुळे ते नेहमीच कसे चर्चेचा विषय होते यावर बिग बी यांनी प्रकाश टाकला होता. त्यांची ती मुलाखत चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय होती. अशातच शत्रुघ्न सिन्हा यांची मुलाखत आता चर्चेत आली आहे.

कोलकातामध्ये साहित्य आजतकचा जो मोठा सोहळा पार पडतोय त्यात शत्रुघ्न (Latest Bollywood News) सिन्हा यांनी त्यांच्या विषयीच्या अनेक गोष्टी चाहत्यांना सांगितल्या आहेत. त्या मंचावरुन त्यांनी आजवरचा त्यांचा प्रवास, त्यामधील त्यांच्या अडचणी आणि त्यावर त्यांनी केलेली मात याविषयी मोकळेपणानं सांगितले आहे. बॉलीवूडमध्ये आपली जी ओळख तयार झाली त्याची सुरुवात कशी होती यावर देखील ते बोलले.

आज तक नं दिलेल्या त्या मुलाखतीमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांचा परखडपणा दिसून आला आहे. ते म्हणाले, मला माझ्या चित्रपटांमध्ये जास्त फुटेज मिळाले की काही अभिनेत्यांचा जळफळाट व्हायचा. एक काळ होता की, काही हिरोंना माझ्यासोबत काम करायचे नव्हते. त्यांची तशी इच्छाच नसायची. कोणतेही कारण सांगून माझ्यासोबत काम करण्यास ते नकार द्यायचे.

मी सेटवर खूप उशीरा येतो, माझे व्यवहार चांगले नाहीत त्यामुळे मला चित्रपट मिळणे बंद झाले होते. याचा परिणाम माझ्या करिअरवर झाला होता. पण त्यानंतर मी हिरो म्हणून जे चित्रपट केले त्यातून माझ्या करिअरला वेगळे वळण मिळाले. असेही शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले.

मी देखील खूप स्ट्रगल केला. पण धर्मेंद्रजी आणि अमिताभ बच्चन यांनी जितका केला तेवढा मला काही करावा लागला नाही. तुम्हाला खोटं वाटेल पण धर्मेंद्रजी स्वता:च्या चित्रपटांच्या रिल्सचे डब्बे स्वता घेऊन जायचे. अमिताभ यांचा संघर्षही खूप मोठा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT