Shatrughan Sinha talks about his affair  Instagram
मनोरंजन

Shatrughan Sinha: 'ते माझं चुकलंच..', पत्नीचा विश्वासघात केल्याची कबुली देत शत्रुघ्न सिन्हांचा मोठा खुलासा

अरबाज खानच्या 'द इन्विंसिबल' या शो मध्ये शत्रुघ्न सिन्हा गेले असताना त्यांनी आपल्या अफेअर्सविषयी सांगून सगळ्यांना हैराण करून सोडले.

प्रणाली मोरे

Shatrughan Sinha: शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम यांची लव्ह स्टोरी खूपच फिल्मी आहे. प्रत्येक प्रेम कहाणीत जसे काही कठीण परिक्षेचे प्रसंग येतात अगदी तशीच आहे. शत्रुघ्न सिन्हा अरबाज खानच्या 'द इन्विंसिबल' या शो मध्ये नुकतेच सामिल झाले होते. शो मध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी आपलं प्रेम आणि जीवनातील काही भरकटलेल्या क्षणांविषयी देखील बातचीत केली.

त्यांनी सांगितलं की त्यांच्या डोक्यात स्टारडमची हवा घुसली होती. तेव्हा त्यांनी स्वतःला पूनम सिन्हा यांच्यापासूनही लांब ठेवलं होतं. अर्थात ही आपली खूप मोठी चूक होती हे देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे.

शत्रूघ्न सिन्हा यांनी अनेक मुलाखतीतून पूनम सिन्हांसोबतच्या लव्हस्टोरी संदर्भात सांगितलं आहे. अरबाज खानच्या शो मध्ये त्यांनी आपल्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला.

शत्रुघ्न म्हणाले''अभिनयाच्या अभ्यासासाठी घर सोडून रेल्वे स्टेशनवर आलो तेव्हा तिथे काही माझे मित्र आधीपासूनच आले होते. समोरच्या सीटवर एक सुंदर मुलगी बसली होती. मी एवढी सुंदर मुलगी तोपर्यंत पाहिलीच नव्हती..ती पटनाहून आलीय हे ऐकून मी हैराण होतो. नंतर जरा चौकशी केली तेव्हा कळलं ती एका लग्नासाठी आली होती''.(Shatrughan Sinha talks about his affair Arbaaz Khan The Invincible Show)

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ''ती रडत होती कारण तिची आई तिला ओरडली होती. मी आईला सोडून घराबाहेर पडलो होतो तेव्हा मी देखील रडलो होतो. तोपर्यंत मला मुळीच माहित नव्हतं की मी इन्स्टिट्युटला जाणार आहे,स्ट्रगल करणार आहे आणि एक दिवस या मुलीशीच माझं लग्न होणार आहे''.

पूनम सिन्हांना पहिल्यांदा भेटल्यानंतर तब्बल १४ वर्षांनी शत्रुघ्न सिन्हांचे त्यांच्याशी लग्न झाले होते. लग्नाच्या ३ वर्ष आधी आम्ही बोलतही नव्हतो हे सांगून शत्रुघ्न सिन्हा यांनी सर्वांना हैराण करुन सोडले.

यावर स्पष्टिकरण देताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले,''मी पूनमशी बातचीत पूर्ण बंद केली होती. लोकांना वाटायचं माझ्या आयुष्यात कुणी तरी आलं आहे...मी आता यावर नाही बोललो तर योग्य होईल. मला वाटतं चूक माझीच असेल''.

मला पूनम सोबतच्या नात्यातून बाहेर पडायचं होतं..म्हणून मी वाट शोधत होतो..पण तेव्हाही मी यावर पूनमलाच जबाबदार धरलं होतं''.

मला आठवतंय मी म्हटलं होतं, ''तू चांगली नाहीस हा मुद्दाच नाही..पण माझ्यापेक्षा तू खूपच उजवी आहेस, म्हणून आता हे नातं मला निभवायचं नाही''.

हेही वाचा: बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले,''ती माझी खूप मोठी चूक होती. स्टारडम माझ्या डोक्यात गेलं होतं. मला वाटायचं आधी मला कुणी विचारायचं नाही..अचानक एवढ्या जणी माझ्या मागे पुढे करतायत. शेवटी माणूसच..पाय घसरायला फार वेळ लागत नाही. स्वतःला सांभाळणं कठीण होतं''.

'' मी पूनमपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत तिला एक प्रकारे घटस्फोटच दिला होता आमच्यातील पत्रव्यवहार थांबला..पण पूनम बाहेरून माझी सगळी खबर ठेवतेय हे अधनं-मधनं कानावर पडायचं. माझ्या स्टाफला बोलायची,सर एवढे थकलेले का दिसतायत. त्यांना नाश्त्यात हे अमूक द्या. मी नातं तोडलं होतं तरी पूनम माझी काळजी घ्यायची''.

माहितीसाठी सांगतो की त्यावेळेस शत्रुघ्न सिन्हा यांचे नाव रीना रॉयसोबत जोडले होते. पहलाज निहलानी यांनी खुलासा केला होता की, शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्यातील जवळीकता खूप वाढली होती. पूनम सोबत शत्रुघ्न सिन्हा यांनी लग्न केल्यानंतर देखील त्यांचे नाते रीना रॉय सोबत सुरु होते.

पण रीना रॉयला दुसरी चॉइस बनण्यात काही रस नव्हता..त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना सांगितले होते की शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्याशी लग्न करावे आणि तसं झालं नाही तर आपण ८ दिवसांच्या आत दुसऱ्या कोणाशी तरू लग्न करू. शत्रुघ्न सिन्हा असं करू नाही शकले आणि त्यानंतर रीना रॉय यांनी मोहसिन खान यांच्यासोबत लग्न केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

PMPML Buses : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमपीच्या ताफ्यात ४ महिन्यात येणार २००० नवीन बस; प्रवासीसंख्या २० लाखांवर नेण्याचे लक्ष्य

DSP Chitra Kumari : कोचिंग न घेता 20 व्या वर्षी बनली DSP; वडिलांनी लेकीच्या शिक्षणासाठी विकली जमीन, देशभर चर्चेत असलेली सुपर गर्ल कोण?

Malegaon News : मालेगाव जन्मदाखला घोटाळा: १ हजार २७३ दाखले रद्द, ५०० नागरिक गायब; २४ जणांनी परदेशात पलायन केल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये घुसून राडा

SCROLL FOR NEXT