Shatrughan Sinha & Dev Anand Instagram
मनोरंजन

Shatrughan Sinha करणार होते चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी..देवआनंद असं काय बोलले की एका क्षणात बदललेला निर्णय

शत्रुघ्न सिन्हा यांनी एका कार्यक्रमात चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करुन घेणार होतो असं सांगत त्यामागच्या कारणाचा मोठा खुलासा केला अहे.

प्रणाली मोरे

Shatrughan Sinha: एका वृत्तसमुहानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा कोलकाता इथं गेले होते. या इव्हेंटमधील एका खामोश नावाच्या सेशन दरम्यान ७०-८० च्या दशकात सुपरस्टार राहिलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या करिअरविषयी मनमोकळा संवाद साधला.

त्यांनी सांगितलं की लहानपणी त्यांच्या चेहऱ्यावर रेजर ब्लेडमुळे जखम झाली होती,ज्याचे निशाण आजही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतात.

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की,आपल्या करिअरच्या सुरुवातीला त्यांनी जे सिनेमे केले त्यात ते हे निशाण लपवण्याचा खूप प्रयत्न करायचे आणि आपण कुरुप दिसत आहोत असा त्यांचा समज झाला होता.

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की,''लहानपणी ते खूप खट्याळ,मस्तीखोर होते. त्यांचे वडील एकदा अमेरिकेला गेले होते. तेव्हा ते आपल्या आई आणि मामा- मामीसोबत राहत होते. ते अडीच वर्षांचे होते. तेव्हा त्यांच्या मामाला कुठेतरी जायचं होतं. घाई-घाईमध्ये मामाने दाढी केल्यानंतर आपला रेजर ब्लेड तसाच कुठेतरी उघड्यावर ठेवला''.

''मामा निघून जाताच शत्रुघ्न सिन्हा यांची नजर त्या ब्लेडवर पडली आणि त्यांनी आपल्या मोठ्या बहिणीची दाढी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा झालेल्या झटापटीत बहिणीचा गाल कापला गेला होता.त्यानंतर त्यांनी रेजर आपल्या चेहऱ्यावर चालवला. तेव्हा ब्लेड थेट त्यांच्या ओठाच्या खालच्या भागात अडकून बसला''.(Shatrughan Sinha talks about scar on his face dev anand give him useful guidance)

शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले,''तेव्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन इलाज केला गेला नव्हता तर घरगुती उपचारांनी रक्त थांबवून जखम बरी करण्यात आली होती. तेव्हा खूप रक्त वाहिलं होतं तेव्हा राख लावून रक्त थांबवण्यात आलं होतं''.

''त्या जखमेची खूण आजही त्यांच्या चेहऱ्यावर आहे. पण सिनेमात करिअर करण्यासाठी ते जेव्हा आले तेव्हा त्यांना चेहऱ्यावरची ती खूण बोचत होती. ते स्वतःला कुरुप समजायचे. ते सिनेमात आपल्या चेहऱ्यावर विशिष्ट पद्धतीनं हात यासाठी ठेवायचे की कॅमेऱ्यासमोर ती चेहऱ्यावरची खूण दिसू नये. तेव्हा देवआनंद यांनी त्यांना असा जबरदस्त सल्ला दिला होता जो त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहिला''.

ते पुढे म्हणाले,'' मी प्लास्टिक सर्जनशी माझ्या चेहऱ्यावरील खूणेसंदर्भात बोललो होतो. पण देव साहेब मला म्हणाले की तुझं काम चालतंय ना,लोकांना पसंत येतंय,आणि तुझं नाव असंच पुढे अनेक वर्ष लोकांमध्ये चर्चेत राहिल''.

''तुझं नाव-काम चालेल तर पुढे जाऊन हिच खूण स्टाइल बनेल. देवआनंद म्हणाले,माझ्या दातात किती फटी आहेत पण आज हिच स्टाईल बनली आहे. त्यामुळे जे जसं आहे तसं राहू दे''.

त्या दिवशी शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर त्यांनी आपल्या चेहऱ्यावरील त्या खूणेविषयी विचार करणं आणि तिला लपवणं सोडून दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT